JOIN US
मराठी बातम्या / देश / आश्चर्यच..! मृतदेहाजवळ बसून वारंवार हाक मारू लागली आई आणि मुलगा झाला जिवंत

आश्चर्यच..! मृतदेहाजवळ बसून वारंवार हाक मारू लागली आई आणि मुलगा झाला जिवंत

मृतदेहाजवळ बसून आई मोठ-मोठ्याने रडू लागली. त्याचं नाव घेऊन ती मोठ्याने त्याला हाका मारत होती. त्याला हातात धरून ती उठण्यासाठी विनंती करत होती, त्यानंतर घडलेला प्रकार धक्कादायक होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 जून : डॉक्टरांनी मृत घोषित (Doctor declare dead) केल्यानंतर पुन्हा एखादा व्यक्ती जिवंत झाल्याच्या काही घटना आपण ऐकल्या असतील. पण, एक मुलगा दवाखान्यात मृत घोषित केल्यानंतर घरी आल्यावर आईच्या हार्त हाकांमुळं जीवंत झाल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. टायफाईडमुळं मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित करून त्याचा मृतदेह बांधून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. अतिशय जड अंतकरणानं त्याचे आई-वडील त्याला घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर त्याच्या मृतदेहाजवळ बसून आई मोठ-मोठ्याने रडू लागली. त्याचं नाव घेऊन ती मोठ्याने त्याला हाका मारत होती. त्याला हातात धरून ती उठण्यासाठी विनंती करत होती, त्यानंतर घडलेला प्रकार धक्कादायक होता. बांधलेल्या कपड्यांमध्ये मृतदेहाची काहीशी हालचाल (dead sons body to be alive) दिसून आल्याने सर्वजण चकित झाले. मुलाची हालचाल दिसत असल्याने शेजारी उभ्या असलेल्या एकाने त्याच्या तोंडावरील कापड काढले आणि छाती जोरजोरात दाबण्यात सुरुवात केली. त्याच्या हालचाली आणखी जास्त वाढल्याने जमलेल्या लोकांनी ताबडतोब त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची शक्यता 15 टक्के असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत गेली आणि मंगळवारी तो ठणठणीत बरा होऊन घरी परतला. हा सर्व प्रकार हरियाणाच्या किला परिसरातील बहादूरगडच्या शर्मा कुटुंबीयांच्यातील आहे. त्या सहा वर्षीय मुलाचे कुणाल असे नाव आहे. तो पुन्हा जिवंत झाल्याने त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हे वाचा -  धक्कादायक..! पती आणि सासू गळा दाबून पाजत होते विष, 5 वर्षाच्या मुलीने दाखवलं धाडस आणि केलं हे काम मुलाची हालचाल दिसू लागल्यानंतर त्याच्या वडिलांनी देखील त्याचा श्वासोश्वास सुरू होण्यासाठी प्रयत्न करताना त्याच्या तोंडात हवा फुकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कुणालने त्यांच्या ओठांना चावा घेतला. त्यावेळी त्यांच्या ओठातून रक्त देखील आले होते. त्यांना जखम झाली असली तरी त्या जखमेपुढं मुलाचं जिवंत होणं त्यांच्यासाठी खूप मोलाचं होतं. हा सर्व प्रकार घडल्यानं मुलाची आई खूपच आनंदी झाली असून त्यांनी देवानं माझ्या मुलाला पुन्हा श्वास दिला असं म्हटले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या