भोपाळ, 10 जून : रतलाममधील (Madhya Pradesh News) घुमंतू समाजातील 10 हून अधिक लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकार केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलांसह मोठ्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला. आंबा गावातील शिवपुराण आयोजनात त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक गेल्या अनेक दिवसांपासून पुराण ऐकण्यासाठी येत होते. येथेच या लोकांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार करण्याबाबत प्रस्ताव ठेवला. यानंतर आयोजन समिती आणि आनंदगिरी महाराजांनी या सर्वांचं मुंडन, स्नान आणि जानवं धारण करण्यास सांगितलं. यानंतर विधी करून त्यांना हिंदू धर्मात सामील केलं.
(घुमंतू समाज मुस्लीम समुदायापैकी असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं असलं तरी याची पुष्टी करण्यात आलेली नाही. घुमंतू समाज हा भटक्या विमुक्तांपैकी असल्याचं सांगितलं जातं. ) ही सर्वजण गाव आणि आजूबाजूच्या परिसरात वन औषधी विकण्याबरोबर दारोदारी भिक्षा मागून गुजराण करतात. हे लोक गेल्या 75 वर्षांपासून या गावात राहत आहेत. मात्र तरीरी उपेक्षित राहिले. त्यावेळेस गावात शिव महापुराण सुरू होतं. हे लोक हे पुराण ऐकण्यासाठी येत होते. त्याच वेळी त्यांचं मनपरिवर्तन झालं आणि हिंदू धर्माचा स्वीकार करण्याचा विचार केला. विधीनंतर त्यांना हिंदू धर्माचा संकल्प दिला आणि नामकरणही केलं. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर या लोकांचे शपथपत्रही तयार केले आहेत.