Malda: BJP National President Amit Shah addresses a rally, at Nitayapur in Malda, Tuesday, Jan 22, 2019. (PTI Photo) (PTI1_22_2019_000089B)
सिमला 28 जानेवारी : प्रियांका गांधी यांची राजकारणात एंट्री झाल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर सातत्याने टीका सुरू आहे. आता खुद्द भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केलीय. नरेंद्र मोदी यांनी देशाला विकास दिला. तर काँग्रेसने फक्त राहुल आणि प्रियांका यांना जनतेवर थोपवलं अशी टीका त्यांनी केली. अमित शहा हिमाचलमधल्या उना इथं एका रॅलीत बोलत होते. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच गेल्या चार दशकांपासून रेंगाळत असलेली OROP म्हणजेच ‘वन रँक वन पेंशन’ ही योजना मंजूर केली. तर काँग्रेससाठी OROP म्हणजे Only Rahul, Only Priyanka. त्यांनी देशाला फक्त घराणेशाहीच दिली अशी टीकाही त्यांनी केली.” “650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी जामीनावर असलेले काँग्रेसचे नेते मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांना मोदींवर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही.” या आधीही भाजपच्या नेत्यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली होती. सुब्रमण्यम स्वामी ‘प्रियांका गांधी यांना एक आजार आहे, त्याला बायपोलॅरिटी असं म्हणतात. हा आजार सार्वजनिक ठिकाणी अनुकूल नाही. या आजाराने ग्रस्त असलेली लोकं हिंसक होतात आणि लोकांना मारहाण करतात.’ स्वामी पुढे म्हणाले की, ‘लोकांना त्यांच्या या आजाराबद्दल माहिती असलं पाहिजे. प्रियांका गांधी यांचं स्वत: वरील नियंत्रण कधीही सुटू शकतं, ते कुणालाही कळणार नाही.’ बिहारचे मंत्री प्रियांका गांधींची राजकारणात एंट्री झाल्यानंतर आता राजकारणही सुरू झालंय. अनेक पक्षांच्या नेत्यांनी प्रियांकाचं स्वागत केलंय. तर अनेक पक्षांनी टीका. टीका करणाऱ्यांमध्ये भाजपचे नेते अग्रभागी आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि भाजपचे नेते विनोद नारायण झा यांनीही अकलेचे तारे तोडले आहेत. प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी पातळी सोडून टीका केली. ते म्हणाले, " प्रियांका या फक्त सुंदर आहेत. बाकी त्याचं कर्तृत्व काहीही नाही. राजकारणात फक्त सुंदर असण्यामुळे मतं मिळत नाहीत." झा फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्याही पुढे जाऊन ते म्हणाले, प्रियांका यांची ओळख ही त्या रॉबर्ट वड्रा यांच्या पत्नी आहेत ही सुद्धा आहे. रॉबर्ट हे अनेक जमीन घोटाळ्यात अडकले असून त्या घोटाळ्यातले आरोपी आहेत. VIDEO : शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार - संजय राऊत