नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.
नवी दिल्ली, 08 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet) फेरबदल करण्यात आले. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला. या नवीन चेहऱ्यात महाराष्ट्रातील नारायण राणे, (Narayan Rane) कपिल पाटील यांच्यासह एकूण चौघांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांचा आता शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. राणेंकडे मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर शिवसेनेची (Shivsena) पहिली प्रतिक्रिया आली आहे.
शिवसेनेचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया देत राणे यांना जोरदार टोला लगावला आहे. राणे केंद्रात मंत्री झाल्याने कोकणवासीय आता शिवसेनेला अंतर देतील, या म्हणण्यात काहीच तथ्य नसल्याचे खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. तसंच कोण कुणाला अंगावर घेतं हे तुम्ही बघाल, असंही अनिल देसाई म्हणाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अनिल देसाईंनी नारायण राणे यांना आव्हानंही दिलं आहे. शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात कोण कुणालं अंगावर घेतं हे तुम्ही येणाऱ्या काळात बघालच, असे आव्हान अनिल देसाई यांनी दिले. हेही वाचा- मंत्रिमंडळात राज्याच्या शिलेदारांचा आकडा वाढला, नव्या चार शिलेदारांची वर्णी नारायण राणेंना भाजपने केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. ते काय करतात बघुया. हा शह वगैरे काही नाही. कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही. कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणवासिय आणि शिवसेनेमध्ये कधीही अंतर पडणार नाही, असा दावाही अनिल देसाई यांनी केला आहे.