19 जून : भाजपपाठोपाठ यूपीएनेही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची तयारी केलीये. मीरा कुमार यूपीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याची शक्यता आहे. आज विरोधीपक्षांच्या बैठकीत माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पण त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. याबद्दल 22 जूनला अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान, भाजपने चर्चा न करता राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं असा आरोप काँग्रेसने केलाय.