हा फोटो पाहिल्यानंतर आपल्या देशाप्रतीचा अभिमान आणखी उंचावल्याशिवाय राहणार नाही.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 100 तासात जैश-ए-मोहम्मदच्या दोघा दहशतवाद्यांना ठार केले. सोमवारी झालेल्या चकमकीत 55 राष्ट्रीय रायफलचे मेजर विभूती शंकर डोंडियाल शहीद झाले.
शहीद डोंडियाल यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबार दुखाचा डोंगर कोसळा. पण अशातही त्यांना अखेरच निरोप देण्यासाठी त्यांच्या पत्नीने त्यांना अभिमानाने Salute केला.
शहीद डोंडियाल पार्थिव डेहराडूनमध्ये आणण्यात आले तेव्हा पत्नीने I Love You म्हणत त्यांना अखेरचा निरोप दिला.
डोंडियाल यांच्यासह अन्य 4 जवान देखील या चकमकीत शहीद झाले. मेजर डोंडियाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी 'भारत माता की जय' आणि पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या.
मेजर विभूती यांनी एक वर्षापूर्वी फरीदाबाद येथील निकीता कौल यांच्याशी विवाह केला होता. निकीता कौल या मुळच्या काश्मीरच्या आहेत. त्यांचे कुटुंबीय काश्मीरमधून विस्थापित झाले होते.
प्रथम विस्थापित झाल्याचे दु:ख आणि आता पतीच्या निधनामुळे निकीता यांना मोठा धक्का बसला. विभूती आणि निकीता यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांनी लव्ह मॅरेज केले होते.
शहीद डोंडियाल यांच्या पार्थिवाकडे निकीता बराच वेळ पाहत होत्या. एकटक पार्थिवाकडे पाहून त्याजणू शहीद विभूतींशी बोलत होत्या. एकीकडे निकीताकडे पाहून नातेवाईकांच्या काळजाचं पाणी होत होतं, तर दुसरीकडे निकीता या विभूतींच्या भावविश्वात हरवून गेल्या होत्या.
देशासाठी बलिदान देणाऱ्या पतीला निकीता यांनी कपाळावर किस केलं आणि अखेरचा प्रवास सुरू होण्याआधी निकीता यांनी त्यांना I Love You म्हटलं.