देवास, 6 जुलै : या महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील अनेक राज्यात मान्सूस चांगलाच सक्रीय झाला आहे. मध्य प्रदेशात पहिल्यांदाच देवास शहरासह परिसरात मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत अधूनमधून अनेक तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील मुख्य अंतर्गत रस्त्यांसह अनेक वसाहती जलमय झाल्या होत्या. तर सीतावन परिसरात, उदयनगर भागात अनेक नदी-नाले ओसंडून वाहून गेले, काही लोकांच्या घरातील साहित्य वाहून गेले, तर काहींच्या घरात ठेवलेले खाद्यपदार्थ, लसूण, कांदा खराब झाला. दरम्यान, देवासमधून एक धक्कादायक व्हिडीओ आला आहे. एक दुचाकीस्वार लोकांच्या डोळ्यादेखल पुराच्या पाण्यात वाहून गेला. देवासमध्ये लोकांची तारांबळ सकाळपासूनच आकाशात ढगांनी तळ ठोकला होता. सकाळी 10.30 वाजल्यापासून रिमझिम पाऊस सुरू झाला आणि 10.45 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली, त्याचे रुपांतर मुसळधार पावसात झाले. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अधूनमधून पाऊस झाला. त्यामुळे शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ता एमजी रोडसह डझनभर वसाहती जलमय झाल्या होत्या. तर उदयनगर परिसरात अनेक नाले आणि लोहड नदीला उधाण आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचवेळी इंदूर-उदयनगर रस्त्यावर वाहतूक बंद होती. सबलगडमध्ये नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसल्याने घरातील सामान वाहून गेले.
दुचाकीस्वाराला धाडस नडलं? पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेळी, गाई आदी गुरे दगावली. तर देवास येथे एका दुचाकीस्वाराने भलतंच धाडस केल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेला. पुलावरुन पाणी वाहत असताना त्याने टू व्हिलवर वरुन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवास जास्त असल्याने तो दुचाकीसह वाहून गेला. तर शहरातील एबी रोडवरील लाल गेटजवळ दुचाकी घेऊन जाणाऱ्या एका वृद्धाला करंटच्या जोरदार झटका बसला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला वेळीच दूर केल्याने तो थोडक्यात वाचला. जिल्ह्यात सकाळपासून दुपारपर्यंत सरासरी दीड ते दोन इंच पाऊस पडल्याची शक्यता आहे.