JOIN US
मराठी बातम्या / देश / दारुच्या दुकानात घुसून उमा भारतींची तोडफोड, वीट फेकतानाचा Video Viral

दारुच्या दुकानात घुसून उमा भारतींची तोडफोड, वीट फेकतानाचा Video Viral

भाजप नेत्या उमा भारती (BJP leader Uma Bharti) यांनी भोपाळमधील एका दारूच्या दुकानाची तोडफोड केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मध्य प्रदेश, 14 मार्च: भाजप नेत्या उमा भारती (BJP leader Uma Bharti) यांनी भोपाळमधील एका दारूच्या दुकानाची तोडफोड केली आहे. उमा भारती दारुच्या दुकानात (liquor store) वीट फेकताना दिसल्या. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ दिसत आहे की, उमा भारती त्या दुकानात आपल्या समर्थकांसह पोहोचल्या होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी राज्यात दारूबंदीची मागणी केली होती. भोपाळच्या बीएचईएल परिसरातील आझाद नगर येथील दारूच्या दुकानात घुसून उमा भारती यांनी दगडफेक केली. प्रत्यक्षात दारूबंदीबाबत उमा भारतींनी दारू दुकानांबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या

या वर्षी जानेवारी महिन्यात मध्य प्रदेश सरकारने दारू स्वस्त केली होती. तर सत्ताधारी पक्ष भाजपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी गेल्या वर्षी म्हटले होते की, 15 जानेवारी 2022 पर्यंत दारू बंदी होईल अन्यथा रस्त्यावर उतरू. मात्र तारीख संपून अवघ्या दोन दिवसांनी दारूबंदी तर दूरच, शिवराज मंत्रिमंडळानं नवीन दारूचं धोरण जाहीर केलं. नवीन मद्य धोरणांतर्गत विदेशी दारुवरील अबकारी शुल्क 10 वरून 13 टक्के करण्यात आलं आहे. इंग्रजी आणि देशी दारू एकाच दुकानात उपलब्ध असेल. द्राक्षांव्यतिरिक्त, बेरीपासून वाइन देखील बनवण्यास परवानगी असेल. लोक पूर्वीपेक्षा चारपट जास्त दारू घरात ठेवू शकतील. ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये आहे, तो घरीही बार उघडू शकेल. सध्या राज्यात 2544 देशी दारू आणि 1061 विदेशी दारूची दुकाने आहेत. कारवाई न करण्यावर प्रश्न उपस्थित उमा भारती यांनी म्हटलं की, मजुरांची संपूर्ण कमाई या दुकानांमध्ये जाते. हे दुकान सरकारी धोरणाच्या विरोधात असल्याने येथील रहिवासी आणि महिलांनी आक्षेप नोंदविला, विरोध केला, त्यामुळे प्रशासनाने दरवेळी बंद करण्याचं आश्वासन दिलं. मात्र अनेक वर्षे होऊनही तसं होऊ शकलं नाही. आज मी प्रशासनाला आठवडाभरात दुकान बंद करण्याचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती अनेक दिवसांपासून राज्यात दारूबंदीची मागणी करत आहेत. यापूर्वी तिने अनेकदा दारूबंदीविरोधात मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या