JOIN US
मराठी बातम्या / देश / समोसाची वाढलेली किंमत विचारणं जीवाशी, महिला दुकानदार-पोलिसाच्या छळानंतर तरुणानं स्वतःला घेतलं पेटवून

समोसाची वाढलेली किंमत विचारणं जीवाशी, महिला दुकानदार-पोलिसाच्या छळानंतर तरुणानं स्वतःला घेतलं पेटवून

Madhya Pradesh Crime: अनुपपूर (Anuppur)मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा गंभीररित्या जळून मृत्यू झाला आहे.

जाहिरात

पावसाळ्यात सिजनल फूड खावं. पण, तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा भाज्या वाफवलेले किंवा कोशिंबीर बनवून खा किंवा जेवण करताना कमी तेलाचा वापरा करा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मध्य प्रदेश, 28 जुलै: अनुपपूर (Anuppur)मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीची गंभीररित्या जळून मृत्यू झाला आहे. पोलीस आणि एक दुकानदारानं केलेल्या छळवणूकीला कंटाळून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित दुकानदारानं त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. 22 जुलै रोजी अमरकंटक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बांधा गावात ही घटना घडली. वादानंतर (Dispute)छळाला कंटाळलेल्या युवकानं स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. 24 जुलैला जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, 30 वर्षीय बजरु जायसवाल नावाचं तरुण आपल्या मित्रांसोबत एका समोसाच्या स्टॉलवर गेला होता. त्यानं दोन समोसे विकत घेतले. महिला दुकानदार कंचन साहू हिनं बजरु याला 20 रुपये देण्यास सांगितले. त्यावर बजरुनं समोसाच्या वाढती किंमती मागचं कारण विचारलं. याआधी एक समोसा 7.50 रुपये होता. त्यावर साहूनं उत्तर दिलं की, महागाईमुळे समोसाच्या किंमत वाढवली. परमबीर सिंह यांच्याविरोधातल्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचा मोठा निर्णय धक्कादायक म्हणजे, हे प्रकरण एवढं वाढलं की, दुकानदारानं पोलिसांशी संपर्क साधला. भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 294, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. तपासा दरम्यान पोलिसांनी खरेदीदाराची चौकशी केली आणि त्यानंतर त्यानं स्वतःला पेटवून घेतलं. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी बजरु जायसवाल याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. या व्हिडिओत दावा करण्यात आला की, कंचन साहूनं त्याला पेटवलं आणि पोलीस कर्मचाऱ्यानं जायसवाल याला मारहाण केली. महिला दुकानदार कंचन साहूनं माध्यमांना सांगितलं, जायसवालच्या कुटुंबियांनी माझ्या कुटुंबियांना धमकी दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या