JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / आयकर विभागाच्या छाप्यात हाती लागलं 100 किलो सोनं, समोर आले PHOTOS

आयकर विभागाच्या छाप्यात हाती लागलं 100 किलो सोनं, समोर आले PHOTOS

19 जुलै : लखनऊच्या राजा बाजारमध्ये निवासी असलेल्या कन्हय्या लाल रस्तोही यांच्या 5 ठिकाणांवर एकाच वेळी आयकर विभागाने छापे टाकले आहे. या छाप्यामध्ये मोठी रक्कम हाती लागली आहे. रस्तोगी यांच्या भावाकडून 100 किलो सोनं आणि 10 कोटी रक्कम जप्त केले आहे. या छाप्यामध्ये जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल 31 कोटी रुपये आहे. बरं इतकंच नाही तर रस्तोगी कुटुंबियांच्या 98 कोटींच्या अघोषित संपत्तीचे दस्तावेज हाती लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आयकर विभागाची ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते.

0104

19 जुलै : लखनऊच्या राजा बाजारमध्ये निवासी असलेल्या कन्हय्या लाल रस्तोही यांच्या 5 ठिकाणांवर एकाच वेळी आयकर विभागाने छापे टाकले आहे. या छाप्यामध्ये मोठी रक्कम हाती लागली आहे. रस्तोगी यांच्या भावाकडून 100 किलो सोनं आणि 10 कोटी रक्कम जप्त केले आहे.

जाहिरात
0204

या छाप्यामध्ये जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल 31 कोटी रुपये आहे. बरं इतकंच नाही तर रस्तोगी कुटुंबियांच्या 98 कोटींच्या अघोषित संपत्तीचे दस्तावेज हाती लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आयकर विभागाची ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते.

जाहिरात
0304

आयकर विभागाने केलेल्या खुलाश्यानुसार, 'रस्तोगी अॅण्ड सन्स'च्या नावे सोन्याचा मोठा व्यापार आहे. इतर व्यवसायातून रस्तोगी कुटुंबियांनी 60 कोटींपेक्षा जास्त पैसै कमवले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांची करोडोंनी बेनामी संपत्ती आयकर विभागाच्या हाती लागली आहे.

जाहिरात
0404

आयकर विभागाचे प्रवक्ता आणि डिप्टी कमिश्नर जयनाथ वर्मा यांच्या सांगण्यानुसार, कन्हय्या लाल रस्तोगी यांच्या घरातून 8.08 कोटी रुपयांची नगदी आणि 87 किलो सोन्याची बिस्किट, त्याचबरोबर 2 किलो सोन्याचे दागिने आणि 11.64 किलो सोन हस्तंगत करण्यात आलं आहे. यात 8 कोटी रुपये कन्हय्या लाल आणि 1.05 कोटी रुपये संजय रस्तोगीकडून हस्तंगत करण्यात आले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या