JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / घरातल्यांनीही मतं दिली नाहीत म्हणून उमेदवार ढसाढसा रडला

घरातल्यांनीही मतं दिली नाहीत म्हणून उमेदवार ढसाढसा रडला

निवडणुकीत पराभवाचं नाही पण घरच्यांच्या या वागण्याचं मोठं दु:ख झाल्याचं या उमेदवारानं म्हटलं आहे.

0105

लोकसभा निवडणुकीत विजेते जल्लोष करत आहेत तर पराभूत उमेदवार पराभवाची कारणं शोधत आहेत. निवडणुकीत धक्कादायक असे निकाल लागतात. आता एक असा निकाल पंजाबमध्ये समोर आला आहे ज्याने उमेदवाराला पराभवासह वेगळाच धक्का बसला आहे.

जाहिरात
0205

पंजाबमधील जालंधर मतदारसंघात नीतू शर्टन या अपक्ष उमेदवाराला पराभवाने जेवढं दु:ख झालं नाही त्यापेक्षा घरातून कमी मते मिळाल्याचं झालं. उमेदवाराच्या घरातील सदस्यांची सख्या 9 आहे पण त्याला मतमोजणीच्या पहिल्या फेरीत फक्त 5 मतं मिळाली.

जाहिरात
0305

नीतू शर्टन यांना एकूण 856 मते मिळाली. ज्यावेळी त्यांच्या भागातील मतदान मोजलं गेलं त्यावेळी फक्त 5 मतं त्यांना मिळाली. आपल्याला घरच्या लोकांनीच मत दिलं नसल्याचं समजल्यानंतर पराभवापेक्षा कुटुंबातील मतभेदाचं दु:ख असल्याचं त्यांनी म्हटलं. यानंतर तिथंच त्यांना रडू कोसळलं.

जाहिरात
0405

सोशल मीडियावरही या उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच्या घरातील लोकांनीसुद्धा त्याला मत दिलं नाही हे पाहून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात
0505

पंजाबमध्ये 13 लोकसभा मतदारसंघात 8 जागी काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तर अकाली दल आणि भाजला चार तर आम आदमी पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या