सनी देओल भाजपकडून गुरूदासपूर या मतदरसंघातून प्रचार करत आहेत. प्रचारदरम्यान, गुरूदासपूर – अमृतसर नॅशन हायवेवर सोहल गावाजवळ सनी देओल यांच्या गाडीच्या ताफ्याला अपघात झाला. यावेळी तीन गाड्यांचं नुकसान झालं. तर, सनी देओल यांच्या गाडीचा टायर फुटला. समोरून येणाऱ्या गाडीला चुकवताना हा अपघात झाला. यामध्ये सर्व जण सुखरूप असून दुसऱ्या गाड्या बोलावून त्यानंतर सनी देओल प्रचारासाठी पुढे रवाना झाले.
प्रचारादरम्यान सनी देओल यांच्या गाडीच्या ताफ्याला अपघात झाला. सनी देओल सध्या गुरूदासपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत असून प्रचारादरम्यान हा अपघात झाला.
गुरूदासपूर – अमृतसर नॅशन हायवेवर सोहल गावजवळ झालेल्या अपघातानंतर दुसऱ्या गाड्या बोलावून सनी देओल पुढील प्रचारासाठी रवाना झाले.