JOIN US
मराठी बातम्या / देश / Online सुनावणीदरम्यान वकील फेस पॅक आणि बनियानवर; संतापलेल्या न्यायाधीशांनी जारी केला नवा नियम

Online सुनावणीदरम्यान वकील फेस पॅक आणि बनियानवर; संतापलेल्या न्यायाधीशांनी जारी केला नवा नियम

वकील महाशयांचं ते रुप पाहून न्यायाधीशांनी संताप व्यक्त केला आणि नवा नियम जारी केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उत्तर प्रदेश, 2 जुलै : अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad HC) ऑनलाइन सुनावणीदरम्यान एक विचित्र प्रकार समोर आला आहे. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालयांबरोबरच न्यायव्यवस्थाही ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे या दरम्यान अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. अशातच अलाहाबाद हायकोर्टात ऑनलाइन सुनावणीदरम्यान वकील चेहऱ्यावर फेस पॅक लावून आणि बनियान घालून सामील झाले होते. वकील महाशयांचं ते रुप पाहून न्यायाधीश नाराज झाले. सुनावणी ऑनलाइन असली तरी वकिलांना अशा प्रकराचे कृत्य स्वीकारार्ह नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीमध्ये वकील दुचाकीवरुन न्यायालयात सामील झाले होते. विशेष म्हणजे हा व्हिडीओ कॉल होता आणि गाडी चालवताना ते स्वत:च्या अशिलाची बाजू मांडत होते. (Lawyers on face packs and baniyan during online hearings) दरम्यान आता तर वकील महाशय थेट बनियानमध्ये पाहायला मिळाले. यानंतर कोर्टाने सांगितलं की, महिला आणि पुरुष वकिलांसाठी ऑनलाइन सुनावणीदरम्यान (Online Hearing) रंगीत आणि स्वत:च्या मनानुसार कपडे घालता येणार नाही. त्यांना वकिलाचा पोशाख (Dress Code For Lawyers) करणे बंधनकारक असेल, यामध्ये पांढरा शर्ट, महिलांसाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेस, आणि दोघांनाही पांढरा नेक बँड घालणं बंधनकारक असेल. **(हे ही वाचा-** वकिलाची दबंगगिरी; स्कूटरवरूनच Live लिंकद्वारे सुनावणीच्या वाद-विवादाला सुरुवात ) ज्याप्रमाणे न्यायालयात शांत वातावरणात सुनावणी केली जाते, त्याचप्रकारचं वातावरण घरात किंवा जेथून ऑनलाइन सुनावणीत सामील होता, तेथे असणं अपेक्षित असल्याचं कोर्टाने सांगितलं. पुढे जाऊन न्यायाधीश म्हणाले की, वकील सुनावणीदरम्यान जर काळा कोर्ट (Black Coat) घातल असतील तर ते अधिक चांगलं. हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी एका आदेशात सांगितलं की, ऑनलाइन सुनावणीदरम्यान वकील आपल्या इच्छेप्रमाणे पोशाख करू शकत नाहीत. ऑनलाइन सुनावणी ही कोर्ट रुमप्रमाणे व्हायला हवी, त्यामुळे वकिलांनी हे गांभीर्याने घ्यायला हवं असं न्यायाधीशांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या