राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी पत्नी ऐश्वर्या राय बरोबर काडीमोड घ्यायचा निर्णय घेतलाय. घुट घुटकर जीने का क्या फायदा असं म्हणत तेजप्रताप यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्जही दाखल केला. रुग्णालयात असलेल्या लालूंना या बातमीनं धक्का बसलाय.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी पत्नी ऐश्वर्या राय बरोबर काडीमोड घ्यायचा निर्णय घेतलाय.
तेजप्रताप यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्जही दाखल केला. 'घुट घुटकर जीने से कोई फायदा नही', असं तेजप्रताप यांनी घटस्फोटाच्या निर्णयावर सांगितलं.
आपल्या मोठ्या मुलानं लग्नानंतर पाच महिन्यातच घटस्फोट घ्यायचं ठरवलं. हे कळल्यावर रांचीच्या रुग्णालयात असलेले लालूप्रसाद यांची तब्येत आणखी बिघडली असल्याची बातमी येतेय.
लालू प्रसाद यादव .यांचा मुलगा तेजप्रताप यादव याचा गेल्या 5 महिन्याआधी विवाह झाला होता पण आता तो त्याची पत्नी ऐश्वर्याकडून घटस्फोट मागत आहे. घटस्फोटासाठी तेजप्रतापने पटनाच्या सिव्हिल कोर्टात घटस्फोट याचिका दाखल केली आहे.
हाती मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांच्या घरी काही व्यवस्थित परिस्थिती नाही आहे. आधी त्यांच्या दोन्ही भावांमध्ये भांडणं सुरू असल्याची बातमी होती तर आता तेजप्रताप आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे.
गेल्या 5 महिन्यांआधीच तेजप्रताप यादव याचा विवाह आरजेडीचे नेते आणि बिहार सरकारचे मंत्री चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय हिच्यासोबत झाला होता. पण आता 13 (1)(1a) हिन्दु मॅरेज एक्ट अंतर्गत त्याने घटस्फोटाची मागणी केली आहे.
तेज प्रताप आणि ऐश्वर्या रायमध्ये असं काय झालं ज्यामुळे तेज प्रतापने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला याबद्दल अद्याप कळू शकलेलं नाही. पण जाणून घेऊयात कोण आहे ऐश्वर्या राय...
- ऐश्वर्या राय ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात आहे. दरोगा राय यांचे पुत्र चंद्रिका राय हे बिहार सरकारमध्ये मंत्री होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी तेजप्रताप आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांचा एक रोमँटिक फोटो त्याच्या इन्स्टाग्रावर पोस्ट केला होता. तेज प्रतापने नवविवाहित वधूला सायकलवर डबलसीट बसवल्याचा हा फोटो होता.
तेज प्रताप आणि ऐश्वर्या परस्परांकडे पाहून नजरेमधून प्रेम व्यक्त करत असल्याचा हा रोमँटिक फोटो होता. १५ मे रोजी पाटण्याच्या मैदानावर तेज प्रताप आणि ऐश्वर्याचा शाही विवाह पार पडला. अनेक हायप्रोफाईल पाहुणे मंडळी वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते.