JOIN US
मराठी बातम्या / देश / Lakhimpur Kheri case: आशिष मिश्रांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला जामीन

Lakhimpur Kheri case: आशिष मिश्रांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला जामीन

लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri violence case) प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला आज मोठा झटका बसला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 एप्रिल: केंद्रीय गृह राज्यमंत्री (Union Home Minister Ajay Kumar Mishra) अजय कुमार मिश्रा (Ashish Mishra)उर्फ ​​टेनी यांचा मुलगा आणि लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri violence case) प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला आज मोठा झटका बसला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) जामीन देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्णय फिरवला आणि जामीन रद्द करण्यात आला आहे. यासोबतच न्यायालयाने आशिष मिश्रा यांना आठवडाभरात सरेंडर करण्यास सांगितलं आहे. निकाल दिल्यानंतर न्यायालयानं हे प्रकरण पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात (Allahabad High Court) नव्यानं सुनावणीसाठी पाठवलं आहे. लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. यासोबतच न्यायालयाने आशिष मिश्रा यांना आठवडाभरात सरेंडर करण्याचे आदेश दिलेत. आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे, ज्यावर लखीमपूर खेरी येथे 3 ऑक्टोबर रोजी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडल्याचा आरोप आहे. मृताच्या कुटुंबीयांनी मागितली होती दाद या हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकारकडून अर्थपूर्ण आणि प्रभावी मदत दिली जात नसल्यानं कायद्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य नाही, असे याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान याआधी अधिवक्ता शिवकुमार त्रिपाठी आणि सीएस पांडा यांनी आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेतली. हे आहे संपूर्ण प्रकरण हे प्रकरण गेल्यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यादरम्यान लखीमपूर खेरी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराशी संबंधित आहे. काही शेतकरी केशव प्रसाद यांच्या भेटीला विरोध करत होते, त्यावर भरधाव वेगात एक एसयूव्ही कार धडकली आणि शेतकरी चिरडला गेला. या हिंसाचारानंतर संतप्त शेतकऱ्यांनी ड्रायव्हर आणि दोन भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. ही कार आशिष मिश्रा चालवत होता, असा आरोप आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या