श्रीनगर, 08 जुलै: जम्मू काश्मीरमधील (Jammu & Kashmir) पुलवामा **(Pulwama)**भागातल्या पुचल **(Puchal)**मध्ये दहशतवादी **(terrorists)**आणि भारतीय सैन्यात (Security Forces) चकमक सुरु आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेली चकमक अद्यापही सुरु आहे. घटनास्थळी भारतीय सैन्य, निमलष्करी दले, अग्निशमन दल आणि राज्य पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या जवानांनी या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटली नाही आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं, अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे. पुचलमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यानं तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु केलं. काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 5 दहशतवादी ठार झाले आहे. यासाठी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचं अभिनंदन.
राजौरीमध्ये भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यात पाकिस्तानचा दहशतवादी ठार झाला आहे. बुधवारी राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेत (एलओसी) घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. या चकमकीत दोन सैनिकही जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून एक एके 47 रायफल, चार एके 47 चे मॅगजीन आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले.