JOIN US
मराठी बातम्या / देश / पंपोरमध्ये भारतीय सैन्य-दहशतवाद्यांमध्ये चकमक, दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा खात्मा

पंपोरमध्ये भारतीय सैन्य-दहशतवाद्यांमध्ये चकमक, दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu and Kashmir Encounter: पंपोर (Pampore ) भागात आज भारतीय सैन्य (Security forces ) आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorist)चकमक झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 20 ऑगस्ट: जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir ) अवंतीपोराच्या (Awantipora) पंपोर (Pampore ) भागात आज भारतीय सैन्य (Security forces ) आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorist)चकमक झाली. बराच तास चाललेल्या चकमकीनंतर (encounter) भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनच्या (Hizb-ul-Mujahideen) हिट स्क्वॉयडचा एक भाग होते. तसंच त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांची हत्या ही केली होती. दहशतवाद्यांकडून एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

ठार झालेल्या एक दहशतवाद्याचा नाव मुसाएब मुश्ताक असल्याचं सांगितलं जात आहे. काश्मीरच्या IGP विजय कुमार यांनी सांगितलं की, मुसाएब हा खिरयूचा रहिवासी आहे. त्यानं 23 जुलैला सरकारी शाळेतील एका शिपायाची हत्या केली होती.

संबंधित बातम्या

गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह तीन जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जाहिरात

गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यातील थानामंडी भागात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्यांला ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं. तसंच यात भारतीय सैन्याचे एक JOC देखील शहीद झाले. एक पोलीस अधिकाऱ्यांनं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जवानांनी थानामंडी भागात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या