JOIN US
मराठी बातम्या / देश / ‘आम्हाला घरात कैद केलंय’ ओमर अब्दुल्लांच्या आरोपाला पोलिसांनी दिलं ‘हे’ उत्तर

‘आम्हाला घरात कैद केलंय’ ओमर अब्दुल्लांच्या आरोपाला पोलिसांनी दिलं ‘हे’ उत्तर

जम्मू काश्मीरचे (Jammu -Kashmir) माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी एक गंभीर आरोप केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 14 फेब्रुवारी : जम्मू काश्मीर पुनर्गठन (संशोधन) विधेयक 2021  ( Jammu and Kashmir Reorganization (Amendment) Bill-2021) शनिवारी लोकसभेत मंजूर झालं. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू काश्मीरचे (Jammu -Kashmir) माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ‘मला आणि माझ्या परिवाराला घरात कैद केलं आहे’’ असा आरोप अब्दुल्ला यांनी केला आहे. ओमर अब्दुल्ला यांचे वडील आणि खासदार फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) रविवारी गांदरबलमध्ये जाणार होते. तर ओमर यांचा गुलमर्गमध्ये एक कार्यक्रम होता. त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनाही पुलवामा जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. ( वाचा :  जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा कधी मिळणार? अमित शहांनी दिलं लोकसभेत उत्तर ) काय म्हणाले ओमर? घरामध्ये नजरकैद केल्यानं नाराज झालेल्या ओमर यांनी ट्विट केलं आहे. “ऑगस्ट 2019 नंतरचा हा नवा काश्मीर आहे. आम्हाला कोणतंही कारण न देता घरामध्ये कैद करण्यात आलं आहे. त्यांनी विद्यमान खासदार असलेल्या माझ्या वडिलांना आमच्या घरात कैद केलं आहे. माझी बहिण आणि त्यांच्या मुलांनाही कैद करण्यात आलं आहे.’’

श्रीनगर पोलिसांचं स्पष्टीकरण ओमर अब्दुला यांनी केलेल्या आरोपाला श्रीनगर पोलिसांनी (Srinagar Police) ट्विटरवरच उत्तर दिलं आहे. आज लेथपोरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष झाली आहेत. प्रतिकूल सूचना मिळाल्यानं कोणत्याही व्हीआयपी व्यक्तींनी कोणताही कार्यक्रम ठेवू नये अशी सूचना यापूर्वीच दिली होती.’’ असं उत्तर श्रीनगर पोलिसांनी दिलं आहे.

यापूर्वी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी शनिवारी, आपल्याला घरात नजरकैद केल्याचा आरोप केला होता. पारिमपोरा भागातील चकमकीत मारले गेलेल्या तीन पैकी एका दहशतवाद्याच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर घरात नजरकैद केल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या