श्रीनगर, 11 मार्च: Army chopper crashes in Bandipora:जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बांदीपोरा जिल्ह्यात (Bandipora district) लष्कराचे हेलिकॉप्टर (Army helicopter) कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हेलिकॉप्टरमधील पायलट आणि सहवैमानिकाबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही आहे. गुजरन नाला (Gujran Nallah) परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं. सध्या बचावकार्य सुरू आहे. असं म्हटलं जात आहे की, पायलट आणि सह-वैमानिक अपघातापूर्वी हेलिकॉप्टरमधून बाहेर पडले असावेत, जेणेकरून ते सुरक्षित असतील. मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
गुरेझच्या एसडीएमनं सांगितलं की, दुर्घटनेनंतर त्या आर्मी हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकत नाही आहे. इतर तपशीलांची प्रतीक्षा आहे. त्याचवेळी, संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरेझ सेक्टरच्या बरौम भागात भारतीय लष्कराचे एक चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टरचा पायलट आणि सहवैमानिक यांना वाचवण्यासाठी सुरक्षा दलाच्या तुकड्या बर्फाळ भागात पोहोचल्या आहेत.