JOIN US
मराठी बातम्या / देश / सरकारचा WhatsApp ला पुन्हा धक्का, नव्या धोरणाबाबत पाठवली नोटीस

सरकारचा WhatsApp ला पुन्हा धक्का, नव्या धोरणाबाबत पाठवली नोटीस

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं (IT Ministry) पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपला (Whats app) आपलं नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 मे : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं (IT Ministry) पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपला (Whats App) आपलं नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपकडून दावा करण्यात आला आहे की, त्यांनी आपले गोपनीयता धोरण 15 मे 2021 नंतरही पुढे ढकलले आहे. मात्र, बुधवारी मंत्रालयाने म्हटले आहे की, नवीन धोरण फक्त पुढं ढकलून चालणार नाही. तेवढ्यानं भारतीय वापरकर्त्यांची गोपनीयता आणि डेटा सुरक्षा अबाधित राहणार नाही. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी मंत्रालयाचे असे मत आहे की, व्हॉट्सअ‍ॅपने गोपनीयता धोरणात बदल केल्यामुळे भारतीयांच्या गोपनीयता आणि डेटा सुरक्षा कमी होणार आहे आणि त्यातून भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांची हानी होणार आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी सरकारने व्हॉट्सअॅपला सात दिवसांचा कालावधी दिला असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कायद्यानुसार आवश्यक ती पावले उचलली जातील, असे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 18 मे रोजी सरकारकडून व्हॉटसअपला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर आता व्हॉटसअप काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. व्हॉट्सअॅपला पाठविलेल्या नोटीसमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन गोपनीयता धोरणानं विद्यमान भारतीय कायद्यांचे आणि नियमांच्या अनेक तरतुदींचे उल्लंघन केले जाणार आहे. भारतीय नागरिकांच्या हक्कांचे आणि हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सरकार भारतीय कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा सध्या विचार करत आहे. हे वाचा -  300 पेक्षा जास्त Covid मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अखेर त्यालाच कोरोनानं गाठलं आणि… युरोपमधील वापरकर्त्यांच्या तुलनेत व्हॉट्सअॅपद्वारे भारतीय वापरकर्त्यांवर अन्याय केला जात असल्याचा मुद्दा आयटी विभागानं लावून धरला आहे. न्यायालयातही मंत्रालयाकडून हा मुद्दा पुढे करत युरोप आणि भारतीय वापरकर्त्यांमध्ये भेदभाव केला जात असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात हीच भूमिका ठामपणे मांडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हे वाचा -  काठीनं डोकं फोडलं; बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या नराधम बापाचा मुलीनं केला खून दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या वापरकर्त्यांना गोपनीयता धोरणात बदल लागू करण्यासाठी 15 मेची मुदत दिली होती. परंतु, नंतर ही मुदत रद्द केली गेली. नवीन अटींचे पालन न केल्यास कोणत्याही वापरकर्त्याचे खाते बंद केले जाणार नाही असेही कंपनीने म्हटले होते. यानंतर कंपनीने आपल्या नव्या निर्णयात म्हटले आहे की, जे लोक अटी स्वीकारणार नाहीत ते अ‍ॅपवर येणारे व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल यासारख्या वैशिष्ट्यांचा वापर करू शकणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या