JOIN US
मराठी बातम्या / देश / भारतात आत्मघातकी हल्लाचा मोठा कट, रशियात पकडला IS चा सुसाईड बॉम्बर

भारतात आत्मघातकी हल्लाचा मोठा कट, रशियात पकडला IS चा सुसाईड बॉम्बर

भाजपचा वरिष्ठ नेता IS च्या निशाण्यावर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मध्य आशियातला हा दहशतवादी, तुर्कीत असताना इसिसच्या संपर्कात आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : ऐन सणासुदीत देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतात आताच्या घडीला अनेक घटना घडत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपाताचा कट उधळला. तर दुसरीकडे महाराष्ट्रात हरिहरेश्वर इथे संशयित बोट सापडली असून त्यामध्ये शस्त्र सापडली आहेत. आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ISIS च्या निशाण्यावर पुन्हा एकदा भारत असल्याची माहिती मिळाली आहे. भारतात सुसाईड अटॅक घडवून आणण्याचा ISIS चा प्लॅन असल्याची माहिती मिळाली आहे. रशियातून भारतात येणाऱ्या एकाचा अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. हा व्यक्ती संशयास्पदरित्या रशियामार्गे भारतात घुसणार होता. त्याच वेळी त्याला भारतात येताना अटक करण्यात आली.़ Pulwama : सुरक्षा दलाने मोठ्या घातपाताचा कट उधळला, 10 किलो स्फोटकं जप्त

संबंधित बातम्या

भाजपचा वरिष्ठ नेता ISIS च्या निशाण्यावर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मध्य आशियातला हा दहशतवादी, तुर्कीत असताना इसिसच्या संपर्कात आला. त्यांनी आत्मघातकी हल्ल्याचा कट रचला. हा कट उधळून लावण्यात यश आलं आहे. या प्रकरणी आता अधिक चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या