JOIN US
मराठी बातम्या / देश / CM तीरथ रावतांच्या मुलीनंच फाटलेली जीन्स घातली का? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं तथ्य

CM तीरथ रावतांच्या मुलीनंच फाटलेली जीन्स घातली का? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं तथ्य

Fact Check: सध्या सोशल मीडियात फाटकी जीन्स (Ripped Jeans) घातलेल्या एका युवतीचा फोटो व्हायरल होतं आहे. ही युवती फाटक्या जीन्स संदर्भात वादग्रस्त विधान करणारे मुख्यमंत्री तीरथ रावत यांची मुलगी असल्याचा (Is CM rawat’s daughter wore ripped jeans?) दावा केला जात आहे. जाणून घ्या या फोटोमागील सत्य…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिली, 19 मार्च: गेल्या दोन दिवसांपासून देशात महिलांच्या फाटलेल्या जीन्सबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. उत्तराखंडच्या मुख्यामंत्र्यांनी (CM Tirath Singh Rawat) महिलांच्या फाटक्या जीन्सबाबत (Ripped Jeans) वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलं होतं. त्यानंतर देशातील अनेक लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर आक्षेप नोंदवला. तर अनेकांनी कडव्या शब्दांत मुख्यमंत्र्यावर तोंडसुख घेतलं आहे. असं असताना सध्या सोशल मीडियात एक फोटो जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, संबंधित मुख्यमंत्र्याच्या मुलीनेच जीन्स परिधान (Tirath Singh Rawat’s daughter ware ripped jeans) केली आहे. चला तर जाणून घेऊयात या फोटोमागचं तथ्य (Fact Check)… खरंतर, सध्या सोशल मीडियावर ‘चक दे’ (Check De) फेम अभिनेत्री चित्राशी रावतचा (Actress Chitrashi Rawat) एका फोटो व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये तिने फाटलेली जीन्स परिधान केली आहे. हा फोटो व्हायरल होतं असताना, असा दावा केला जात आहे की, चित्राशी रावत या वादग्रस्त विधान करणारे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ रावत यांच्या कन्या आहेत. अभिनेत्री चित्राशी रावत यांचा फोटो शेअर करत अनेक नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री तीरथ रावत यांना टार्गेट केलं आहे. पण आता अभिनेत्री चित्राशी रावतने याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. अभिनेत्री चित्राशी रावतने आजतक शी बोलताना सांगितलं की, ‘सध्या सोशल मीडियावर माझा एक फोटो व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये मी एक रिप्ड जीन्स परिधान केली आहे. हा फोटो व्हायरल होताना, असा दावा केला जात आहे की, मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ रावत यांची मुलगी आहे. पण हे पूर्णपणे खोटं आहे. हे खरं आहे की, माझ्या वडिलांचं नावही तीर्थ सिंह रावत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा गोंधळा उडाला आहे.

संबंधित बातम्या

काय आहे प्रकरण? दोन दिवसांपूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सच्या वापरावरून महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी एक अनुभव सांगितला होता. ते असं म्हणाले होते की, ‘मी एकदा विमानप्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन माझ्या शेजारी बसली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचं सांगितलं. तिने असं देखील सांगितलं की, तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहेत आणि स्वतः त्या एका महिला स्वयंसेवी संस्था चालवतात’. हे ही वाचा - ‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांची टीका यावर रावत यांनी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं. ते पुढे असं म्हणाले की, ‘माझ्या मनात विचार आला, जी महिला NGO चालवते आणि फाटलेली जीन्स घालते, ती समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल.’ त्यांनी पुढे असं देखील म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृतीपासून दूर राहायला हवं. रावत यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून पडसाद उमटले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या