JOIN US
मराठी बातम्या / देश / BIG NEWS मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईला 10 वर्षांची शिक्षा

BIG NEWS मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईला 10 वर्षांची शिक्षा

संयुक्त राष्ट्राने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. मात्र यानंतरही तो राजरोसपणे पाकिस्तानात फिरत होता.

जाहिरात

**EDS: FILE PICTURE** New Delhi: In this Friday, Dec. 20, 2019 file picture JuD chief Hafiz Saeed is produced at a court in Lahore. An anti-terrorism court in Pakistan, Wednesday, Feb. 12, 2020, sentenced the Mumbai attack mastermind Saeed to 11 years in jail in a terror financing case. (PTI Photo) (PTI2_12_2020_000099B)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद 19 नोव्हेंबर:  मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद हा सध्या लाहोरच्या जेलमध्ये बंद आहे. त्याच्यावर दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा (Terror Funding)  केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानातल्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने सईदला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सईद हा जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. या संस्थेच्या आडूनच तो दहशतवाद्यांना खत पाणी घालत असतो. मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात तो भारताला मोस्ट वॉन्टेंड आहे. या आधी पाकिस्तानच्या न्यायालयाने सईदचा सहकारी याह्या मुजाहिद याला दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा (Terror Funding) केल्या प्रकरणी 32 वर्षांची शिक्षा सुनावली होती. संयुक्त राष्ट्राने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. मात्र यानंतरही तो राजरोसपणे पाकिस्तानात फिरत होता. मात्र नंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद याला 17 जुलै 2019रोजी पाकिस्तान सरकारने लाहोरमधून अटक केली होती. सईद विरुद्ध कारवाई करण्यासाठी भारताने पाकिस्तानवर सातत्याने दबाव टाकला होता. सईदवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव देखील होता. त्याला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी सईदला अटक करण्यात आली. मुंबई हल्ला, उरी आणि पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेले हल्ले यामागे सईदचा हात होता. 2009मध्ये झालेल्या टेरर फंडिंगच्या एका प्रकरणात पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने त्याला लाहोरमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी सईदसह जमात-उद-दावाच्या अन्य 13 नेत्यांच्याविरुद्ध 23 खटले दाखल केले आहेत. खटले दाखल झाल्यानंतर या सर्वांच्या अटकेची कारवाई वेगाने करण्यात आली. सईद लाहोरहून गुजरांवालाकडे जात असताना दहशतवाद विरोधी विभागाने त्याला अटक केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या