JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / महिला ट्रॅफिक पोलिसाने रस्त्यावरच पतीला दिले गुलाबाचे फुल, इंटरेस्टिंग आहे कारण

महिला ट्रॅफिक पोलिसाने रस्त्यावरच पतीला दिले गुलाबाचे फुल, इंटरेस्टिंग आहे कारण

रहदारीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना ट्रॅफिक पोलिसांनी पकडणं हे नित्याचं आहे. पण ट्रॅफिक पोलीस पत्नी असेल आणि तिच्यासमोर हेल्मेटशिवाय गाडी चालवणारा पतीच आला तर…

0105

हेल्मेटशिवाय गाडी चालवणाऱ्यांना दंड आकारणारे पोलीस हे आता नित्याचं चित्र झालं आहे. महिला ट्रॅफिक पोलीसही हल्ली या कारवाईत सामील असतात.

जाहिरात
0205

पण ड्युटीवर असणाऱ्या महिला ट्रॅफिक पोलिसानं आपल्या पतीलाच बिनाहेल्मेट गाडी चालवताना पकडलं तर काय होईल हे हरयाणामधल्या झज्जरच्या रस्त्यावर पाहायला मिळालं.

जाहिरात
0305

झज्जरमध्ये स्थानिक पोलीस अधीक्षकांनी एक नवी मोहीम सुरू केली आहे. ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना ते गुलाबाचं फुल देऊन नियम पाळण्याचं आवाहन करतात.

जाहिरात
0405

या गांधीगिरी मोहिमेत गुरुवारी एक वेगळाच सीन झाला. जिथे ट्रॅफिक पोलिसांचं चेकिंग सुरू होतं, त्याच रस्त्यावरून एक महाशय हेल्मेटशिवाय जात असताना दिसले. लेडी पोलीसने त्यांना अडवलं तेव्हा दोघेही एकमेकांकडे बघून हसले.

जाहिरात
0505

पोलीस पत्नीने पतीलाच ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करताना पकडलं होतं. तेव्हा गुलाबाचं फुल आणि चॉकलेट देऊन या पतीदेवांना गोड शब्दांत समजावलं गेलं आणि पुन्हा नियमाचं उल्लंघन न करण्याविषयी तंबी दिली गेली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या