वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानातून परत येतायत. कालपर्यंत ( 28 फेब्रुवारी ) अभिनंदन यांना परत आणण्यासाठी देशभरातून जोरदार अपिल सुरू होतं. #BringAbhinandanBack हा ट्रेंड होता.
शैलेंद्र वांगू, नवी दिल्ली 1 मार्च : अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवत पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाला अस्मान दाखवणारा अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर दोन दिवसांनी भारतात परत येतोय. जागतिक दबाव आणि मुत्सद्दगीरीच्या बळावर अभिनंदनला भारताने सोडायला भाग पाडले आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सुटकेची घोषणा केली. पण पडद्यामागे मोठं नाट्य घडत होतं. 27 फेब्रुवारीला अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर भारताचे ‘मिशन अभिनंदन’ सुरू झालं. जिनिव्हा करारानुसार पकिस्तानने भारताला औपचारिकपणे अभिनंदन ताब्यात असल्याची माहिती दिली. नंतर भारताने त्याला तातडीन सोडा अशी विनंती पाकिस्तानला केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने सर्व माहिती द्यायला सुरुवात केली. भारताने अमेरिक, ब्रिटन, फ्रांन्स आणि सऊदी या देशांना माहिती दिली. त्या सर्व देशांनी अभिनंदनची सुटका करावी यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला. त्यानंतर भारताने सर्व सार्क देशांनाची विश्वासात घेतलं. त्यांनीही पाकिस्तानवर दबाव आणला. अमेरिका, ब्रिटन आणि सऊदी अरेबीयाने पाकिस्तानला सांगितले की, अभिनंदनला सोडलं नाही तर भारताला शांत करणे कठिण जाईल आणि सीमेवर तणाव वाढेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्याने शेवटी तणाव निवळण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्याचबरोबर अभिनंदनचे वडिल हवाई दलात अनेक वर्ष होते. त्यांचेही पाकिस्तानातल्या अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे अभिनंदन हा त्यांचा मुलगा आहे हे त्यांना कळाल्यावर त्या संबंधांचाही परिणाम झाला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे दोन दिवसातच अभिनंदनला सोडावं लागलं.