JOIN US
मराठी बातम्या / देश / अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच गोळी झाडली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 12 जून : अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.  त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते निराशेच्या अवस्थेत होते अशीही माहिती आहे. त्या निराशेतूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश सरकारनं राज्यातल्या विविध संत मंडळींना मंत्रीपदाचा दर्जा दिला होता त्यात भय्यूजी महाराज यांचाही समावेश होता. मॉडेलिंग ते आध्यात्मिक गुरू असा त्यांचा चढता आलेख होता. 1968 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. सर्वच पक्षांमधल्या राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. विविध आंदोलनांमध्ये मध्यस्त्याची भूमिकाही त्यांनी निभावली होती. कोण आहेत भय्यूजी महाराज? स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू (राजकीय गुरू) अनुयायांकडून ‘राष्ट्रसंत’ उपाधी नाव : डॉ. उदयसिंह देशमुख जन्म : 29 एप्रिल 1968 जन्मगाव : सृजलपूर, इंदूर 20 व्या वर्षी मॉडेलिंग दृष्टांत झाल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश 1996 मध्ये सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना वेगवेगळ्या संस्थांच्या स्थापनेत वाटा अनेमिक रुग्णांसाठी विशेष काम भारतभरात 11,11,111 झाडं लावण्याचा संकल्प विलासराव देशमुख आणि अनेक नेत्यांचे गुरू 2 वर्षांपूर्वी पत्नीचं हृदयविकाराने निधन अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जातात. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करतात. मराठा आक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही चर्चा होत्या. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबातून लग्नाचा आग्रह होता. त्यांनी तो आग्रह आता मान्य केला आहे. पहिल्या पत्नीपासून त्यांना कुहू ही 13 वर्षांची मुलगी आहे.मध्यप्रदेशातल्या 30 वर्षीय  डॉ. आयुषी शर्माशी विवाहबद्ध झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या