Mont-de-Marsan: In this IAF HO is seen an IAF Su-30 land during Garuda-VI 2019, a bilateral Indo-French large force employment warfare exercise hosted by French Air Force (FAF) from July 1 to July 12, at Mont-de-Marsan in France, before their return to India on July 19, 2019. (PTI Photo) (PTI7_19_2019_000234B)
नवी दिल्ली 10 ऑक्टोबर: सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी भारत आणि चीन सीमेवरचा तणाव कमी झालेला नाही. चीनकडून होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन भारताने जय्यत तयारी सुरू केली आहे. लष्कराला मदत करण्यासाठी हवाई दलानेही (Indian Air Force) जोरदार तयारी केले असून लढावू विमाने आणि रसद पुरवढा करणाऱ्या हेलिकॉप्टरचे VIDEO बघून चीनलाही धडकी भरणार आहे. लडाख जवळच्या सीमेवर लष्कर आणि हवाईदलाने संयुक्त योजना तयार केली असून जमीन आणि आकाशात भारताचं वर्चस्व कसं राहील याची काळजी घेण्यात येत आहे. या भागात असलेल्या हवाई तळांवर लढाऊ विमाने, सामान आणि दारुगोळा पुरवणारी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली असून त्यांचा नियमित सरावही करण्यात येत आहे.
विश्वासघात आणि विस्तारवाद हे चीनचे धोरण असल्याने भारताने सर्व शक्यता गृहित धरून योजना आखली आहे. चीनने धाडस केलेच तर जशास तसे उत्तर देण्याचे संकेत भारताने यातून दिल्याचं संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. चीनने भारतासोबतच्या उत्तर सीमेवर तब्बल 60 हजार सैनिक तैनात केल्याचा दावा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया सदस्य असलेल्या ‘क्वाड’ (Quad) देशांच्या बैठकीत सर्वच देशांचे परराष्ट्रमंत्री प्रत्यक्ष भेटले होते. त्या बैठकीवर चीनने टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेताना पॉम्पिओ यांनी चीनवर सडकून टीका केली. चीनचा व्यवहार हा बेजबाबदार आणि धोकादायक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
विस्तारवादी असलेल्या चीनने भारताच्या सीमेजवळ 60 हजार सैनिक तैनात केले असून त्यामुळे तणाव निवळणे कठिण असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. ‘क्वाड’ (Quad) समूहातले देश हे जगातले लोकशाहीवादी देश असून त्या सगळ्यांना कम्युनिस्ट चीनपासून धोका वाटतो आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.