JOIN US
मराठी बातम्या / देश / चिंता वाढली; देशात ग्रीन फंगसचा धोका, पहिल्या रुग्णाची नोंद

चिंता वाढली; देशात ग्रीन फंगसचा धोका, पहिल्या रुग्णाची नोंद

ब्लॅक फंगसचा धोका असताना ग्रीन फंगसच्या (Green Fungus) धोका उद्भवला आहे. ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगड, 20 जून: देशासमोरील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. देश कोरोना (Covid-19) व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहे. त्यात आता दुसरं संकट उभं ठाकलं आहे. ब्लॅक फंगसचा धोका असताना ग्रीन फंगसच्या (Green Fungus) धोका उद्भवला आहे. देशात ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्ये (Punjab Reports) ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. कोविड -19 मधून बरे झालेल्या एका व्यक्तीमध्ये ग्रीन फंगस आढळून आला आहे. जालंधर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णाला खोकला सुरु झाला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधित रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच रुग्णाच्या छातीतही वारंवार दुखत होतं. पंजाब राज्यात यापूर्वी राज्यात ग्रीन फंगसच्या रुग्णांबद्दल बातमी आली होती. मात्र ते स्पष्ट झालं नव्हतं.

संबंधित बातम्या

हेही वाचा-  मुंबई लोकलबाबत महापौर किशोरी पेडणेकरांचं महत्त्वाचं विधान जालंधर जिल्हा सिव्हिल रुग्णालयाचे साथीचा रोग विशेषज्ञ, डॉ परमवीर सिंग यांच्या मते, ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण सापडला. यापूर्वी या रुग्णाला कोरोनाचीही लागण झाली होती. रुग्ण नुकताच कोरोनामुक्त झाला होता. सध्या त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले आहे. मात्र रुग्णाची स्थिती स्थिर आहे का हे निश्चित सांगता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या