JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / भारताचा डिप्लोमॅटिक विजय; या मोहिमेत भारताने दाखवलेले हे आहेत मुत्सद्देगिरीचे 11 नमुने

भारताचा डिप्लोमॅटिक विजय; या मोहिमेत भारताने दाखवलेले हे आहेत मुत्सद्देगिरीचे 11 नमुने

पाकिस्तानच्या ताब्यात असणारा भारतीय पायलट अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा झाली. या संपूर्ण कारवाईपासून या चांगल्या बातमीपर्यंत भारताच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीची झलक दिसली. हे आहेत 10 मुत्सद्देगिरीचे मुद्दे

0113

0213

पुलावामामध्ये दहशतवाद्यांनी CRPFच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी आणि सरकारने एकत्रितपणे कुठलाही आतताई निर्णय न घेता मुत्सद्देगिरीने परिपूर्ण प्लॅन बनवला. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ही योजना आखली होती. त्यांनी पाकिस्तान भारताचे गुप्तहेर म्हणून काम केलं आहे. सर्जिकल स्ट्राईक करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.

जाहिरात
0313

आंतरराष्ट्रीय हद्दीचं उल्लंघन न करता पाकव्याप्त काश्मीरमधले जैश ए मोहम्मदचे तळ लक्ष्य करायचे ठरले. याबाबत गुप्तता पाळण्यात आली.

जाहिरात
0413

प्रत्यक्ष कारवाईनंतर मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवत परराष्ट्र मंत्रालयातर्फे या कारवाईची अधिकृत माहिती देण्यात आली. भारतीय सैन्यदलातील कोणीही याविषयी कुठलीही माहिती दिली नाही. याउलट पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मात्र ट्वीट करून भारतीयांनी हल्ला केल्याचा कांगावा सुरू केला.

जाहिरात
0513

परराष्ट्र सचिवांनी ही कारवाई प्रतिबंधात्मक (Pre-emptive) स्वरूपाची असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना किंवा नागरिकांना अजिबात धक्का न लावता दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

जाहिरात
0613

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण केलेल्या कारवाईची माहिती योग्य प्रकारे पोहचेल याची काळजी घेतली. त्यानुसार संयुक्त राष्ट्र आणि आपल्या मित्र राष्ट्रांना याविषयी कल्पना देण्यात आली.

जाहिरात
0713

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण केलेल्या कारवाईची माहिती योग्य प्रकारे पोहचेल याची काळजी घेतली. त्यानुसार संयुक्त राष्ट्र आणि आपल्या मित्र राष्ट्रांना याविषयी कल्पना देण्यात आली.

जाहिरात
0813

मीडियाशी कुणी बोलायचं याचा पद्धतशीर प्लॅन भारताने केलला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडूनच अधिकृत माहिती देण्यात आली. भारतीय लष्कराने किंवा संरक्षण मंत्रालयाने यात भूमिका घेतली नाही आणि भारताच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला. दुसरीकडे मोदींनी लष्कराला सर्वाधिकार देत असल्याचं सांगितलं होतं.

जाहिरात
0913

पाकिस्तानने भारताच्या प्रतिबंधात्मक कारवाईला उत्तर म्हणून सरळ लष्करी हल्ले केले. भारताने तातडीने दखल घेत पाकिस्तानच्या आगळिकीविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती कळवली आणि इतर देशांचा पाठिंबा मिळवला.

जाहिरात
1013

10 देशांच्या उच्चायुक्त कार्यालयांकडून भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळाल्यामुळे पाकिस्तान एकटा पडला. अगदी सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान या पाकिस्तानच्या जवळच्या राष्ट्रांनीही पाकिस्तानची थेट बाजू घेतली नाही.

जाहिरात
1113

मीडियाशी कुणी बोलायचं याचा पद्धतशीर प्लॅन भारताने केलला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडूनच अधिकृत माहिती देण्यात आली. भारतीय लष्कराने किंवा संरक्षण मंत्रालयाने यात भूमिका घेतली नाही आणि भारताच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला. दुसरीकडे मोदींनी लष्कराला सर्वाधिकार देत असल्याचं सांगितलं होतं.

जाहिरात
1213

पाकिस्तानच्या लष्कर आणि सरकारी पातळीवर मात्र या मुत्सद्देगिरीचा अभाव दिसला. त्यांचे लष्करी अधिकारी ट्वीट करत होते. इम्रान खान यांनीसुद्धा सुरुवातीला 2 वैमानिक ताब्यात असल्याचं सांगितलं आणि संध्याकाळी पाक लष्कराने यू टर्न घेत एकच पायलट असल्याचं कबूल केलं.

जाहिरात
1313

OIC अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन या मुस्लीम राष्ट्रांच्या संघटनेनं भारताला त्यांच्या परिषदेला आमंत्रित केलं आहे. OICचं आमंत्रण पाकिस्तानला झोंबलं असून त्यांनी OICमध्ये सहभागी न होण्याची धमकी दिली होती. पण, पाकिस्तानच्या या धमकीचा OIC वर काहीही परिणाम झाला नाही. भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा परिणाम म्हणता येईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या