JOIN US
मराठी बातम्या / देश / पाकिस्तानला मोठा दणका, आता चीननेही सोडली साथ

पाकिस्तानला मोठा दणका, आता चीननेही सोडली साथ

चीनने उचललेलं हे पाऊल पाकिस्तानसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बिजिंग, 1 मार्च : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा झटका बसला आहे. चीनमधून पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. चीनचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, असं मानलं जातं. या पार्श्वभूमीवर चीनने उचललेलं हे पाऊल पाकिस्तानसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे. पाकची चहुबाजूने कोंडी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धक्का बसला. कारण, जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली. त्याकरता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारतानं मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली होती. या हल्ल्यानंतर अमेरिकेनं देखील भारतासोबत असल्याचं सांगितलं होतं. शिवाय, पाकिस्तानला देखील दहशतवादाच्या मुद्यावरून खडसावलं होतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चीननं देखील भारताला या मागणीला पाठिंबा दिला होता. तुम्ही कितीही कणखर असाल, पण हा VIDEO पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतील

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या