JOIN US
मराठी बातम्या / देश / देशात गेल्या चार दिवसात तब्बल 2.70 कोटी लोकांचं लसीकरण

देशात गेल्या चार दिवसात तब्बल 2.70 कोटी लोकांचं लसीकरण

India Corona Vaccination: देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. दिवसेंदिवस विक्रमी लसीकरणाची (Corona Vaccination) नोंद देशात होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जून: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) ओसरत आहे. अशातच देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. दिवसेंदिवस विक्रमी लसीकरणाची (Corona Vaccination) नोंद देशात होत आहे. आता सतत दुसऱ्या दिवशी 60 लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे. cowin.gov.in वर गुरुवारी रात्री 12 वाजेर्यंत 60.36 लाख लोकांचं लसीकरणाचा डेटा अपडेट करण्यात आला. 21 जूनपासून सुरु झालेली मेगा व्हॅक्सिनेशन ड्राईव्हअंतर्गत गेल्या चार दिवसात 2.70 कोटी लोकांचं लसीकरण पार पडलं आहे. 21 जूनला 90.86 लाख 22 जूनला 54.22 लाख 23 जूनला 64.83 लाख लसीकरणाची नोंद आहे.  गुरुवारी सर्वात जास्त 8.51 लाख लसीचे डोस उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आले. याआधी 22 जूनला इकडाचा आकडा 8 लाखांहून जास्त होता. 7.44 लाख लसीकरणासोबत मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 4 दिवसांत 33 लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण पार पडलं. यातील अर्ध्याहून जास्त डोस म्हणजेच 17 लाख डोस 21 जूनला देण्यात आले. हेही वाचा-  आंबिल ओढ्याचा आक्रोश !, ‘‘शत्रूच्या घरात रणगाडे घुसवावे तसे बुलडोझर घुसवले’’ याव्यतिरिक्त गुजरात आणि महाराष्ट्रात 4-4 लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण पार पडलं. कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात 3 लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण झालं. देशाची राजधानी दिल्लीत केवळ 1.57 लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. ऑस्ट्रेलियातील लसीकरण गेल्या चार दिवसात भारतातील लोकांनी लस घेतली आहे. त्यापेक्षा जास्त लोकसंख्या जगातील 50 देशांमध्ये आहे. यापेक्षा 185 देशांची लोकसंख्या कमी आहे. या काळात ऑस्ट्रेलिया आणि उत्तर कोरियापेक्षा भारताने जास्त लोकांचं लसीकरण केले आहे. उत्तर कोरियाची लोकसंख्या 2.57 कोटी आहे तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.54 कोटी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या