JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / चीनला टेन्शन! हिंदी महासागरात भारत आणि अमेरिकी नौदलाच्या एकत्र युद्धाभ्यासाचे फोटो आले समोर

चीनला टेन्शन! हिंदी महासागरात भारत आणि अमेरिकी नौदलाच्या एकत्र युद्धाभ्यासाचे फोटो आले समोर

भारत आणि अमेरिकेच्या नौदलानं हिंदी महासागरात एकत्र युद्धाभ्यास सुरू केला आहे. यामध्ये अमेरिकेनं रोनाल्डो रिगन नावाच्या कॅरिअर स्ट्राईक ग्रुपही उतरवला. दोन दिवस चालणाऱ्या या युद्धाभ्यासामुळे चीनचं टेन्शन वाढणार, हे मात्र नक्की.

0104

भारतीय युद्धनौकांसह समुद्रावर पहारा देणाऱ्या विमानांचा ताफा आणि मिग-29 जेट विमानंदेखील या युद्धाभ्यासात सहभागी झाली आहेत. त्याचप्रमाणं वायुदलाची सुखोई-30 MKI, फाल्कन, नेत्रा एअरक्राफ्ट आणि IL-78 मिड ही विमानंदेखील सराव करणार आहेत.

जाहिरात
0204

आपापल्या शस्त्रसज्जतेचं मूल्यांकन करणं आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

जाहिरात
0304

दोन्ही देशांतील नौदल कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, नव्या तंत्राची ओळख आणि सुरक्षा साधनांचा अधिक प्रभावी वापर करण्याचं प्रशिक्षण देण्याचा उद्देश या युद्धाभ्यासामागे असल्याचं सरकारनं म्हटलंय.

जाहिरात
0404

भारत आणि अमेरिकेच्या एकत्रित युद्धाभ्यासामुळे चीनची चिंता वाढणार हे मात्र नक्की. हिंद महासागरातही घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनवर यामुळे दबाव वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या