JOIN US
मराठी बातम्या / देश / 'निकालातील टक्क्यांपेक्षा सहवेदनेची जाणीव प्रगल्भ करणारी'; विद्यार्थ्याचा फोटो पाहून होतय कौतुक

'निकालातील टक्क्यांपेक्षा सहवेदनेची जाणीव प्रगल्भ करणारी'; विद्यार्थ्याचा फोटो पाहून होतय कौतुक

काही फोटो हे इतके बोलके असतात की, त्याला कोणत्याही ओळीची आवश्यकता नसते…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Boy Offers Water To Elderly Couple: देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे । घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।। या ओळी विंदा करंदीकरांच्या. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळे वेळोवेळी समाजासाठी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. शाळेत मूल्यशिक्षणाच्या तासाला गरजूंना मदत करावी असं आपल्याला सांगितलं जात. सध्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी मागे पडल्याचं दिसून येतं. मुलांना शाळेत पाठवताना पालक मुलांमागे टक्केवारीचं प्रेशर देत असतात. मुलांना सर्व सोयी-सुविधा पुरवणं, त्यांनी चांगले मार्क मिळवावे यासर्वांच्या नादात बऱ्याचदा समाजाभूमिक काय करायला हवं, समाजाची दुखरी बाजू दाखविण्याचं मात्र पालक विसरून जातात. मात्र यातूनही काही मुलं एखाद्या गरजवंतासाठी उभेही राहतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Viral On Social Media) IAS अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक मुलगा हृदय जिंकणारं काम करताना दिसत आहे..

संबंधित बातम्या

या फोटोमध्ये तुम्हाला शाळेतील एक मुलगा दिसत आहे. या मुलाला शाळेत जाताना रस्त्याच्या किनारी एक वृद्ध दाम्पत्य दिसतं. जे तहानलेलं आहे. यानंतर मुलगा आपल्या बाटलीतील पाणी त्या वृद्ध दाम्पत्याला देतो. तेथील एका व्यक्तीने हा फोटो क्लिक केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या