JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / बापरे! हिरेव्यापाऱ्याने वाढदिवसाला दिली 100 जणांना जंगी पार्टी, दोनच दिवसांत झाला कोरोनाने मृत्यू

बापरे! हिरेव्यापाऱ्याने वाढदिवसाला दिली 100 जणांना जंगी पार्टी, दोनच दिवसांत झाला कोरोनाने मृत्यू

हैदराबादमध्ये याआधीही पार्टी आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याच्या अशा घटना घडल्या असून त्यामुळे काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.

0106

हैदराबादला कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतो आहे. व्हायरसचा प्रसार वेगात असतानाही लोक सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. त्याचा फटका एका हिरेव्यापाऱ्याला बसला. या घटनेने हैदराबाद हादरुन गेलं आहे.

जाहिरात
0206

सरकारने सांगितलेल्या नियमांचं उल्लंघन करत या दिग्गज हिरे व्यापाऱ्याने आपल्या वाढदिवसाला जंगी पार्टी दिली होती.

जाहिरात
0306

या पार्टीत तब्बल 100 जण उपस्थित होते. यात शहरातल्या हिरे व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं सांगण्यात येत असतानाही या व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणावर लोकांना निमंत्रण दिलं होतं.

जाहिरात
0406

वाढदिवसाचं निमित्त असल्याने हा व्यापारी आपल्या पत्नीसह एका जैन मुनीच्या दर्शनालाही गेला होता. वाढदिवसानंतर दोनच दिवसात त्या व्यापाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसून आली आणि तो पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आणि लगेच त्याचा मृत्यू झाला.

जाहिरात
0506

त्यामुळे या कार्यक्रमाला आलेल्या 100 जणांची माहिती काढली जात असून त्या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे.

जाहिरात
0606

हैदराबादमध्ये याआधीही पार्टी आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याच्या अशा घटना घडल्या असून त्यामुळे काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या