हिमाचल प्रदेश, 25 जुलै: हिमाचल प्रदेशातील किन्नौर (Kinnaur) जिल्ह्यात दरड कोसळली (Landslide) आहे. किन्नौर जिल्ह्यातील बटसेरी येथे दरड कोसळून थेट गाडीवर पडला. पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना उपचारासाठी तात्काळ सीएचसी सांगला येथे हलविण्यात आले आहे.
रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित नागरिक हे पर्यटक होते आणि दिल्ली, चंडीगड येथून हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी आले होते.
दरड कोसळल्यानंतर बास्पा नदीवर बांधण्यात आलेला पूल तुटला आहे आणि त्यामुळे गवाचा संपर्क तुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलन झाल्याने मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आणि ही सर्व दरड रस्त्यांवरील गाडीवर आली. भलीमोठी दगड असल्याने गाड्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम सिंह ठाकूर यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “किन्नौरच्या बत्सेरी येथे दरड कोसळून झालेली दुर्घटना खूपच दु:खद आहे. या दुर्घटनेत 9 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दु:खद आहे.”