हाथरस, 1 ऑक्टोबर : आज हाथरस येथे सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले. या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी रस्त्यावर कोसळले. अशावेळी मोठा जमाव येथे उपस्थित होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे.
यावेळी यमुना एक्सप्रेस-वेवर राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्ते व नेते होते. ते हाथरस येथे पीडित कुटुंबीयांना भेटीसाठी जात असताना अडविण्यात आले. हाथरसमध्ये 144 जमावबंदी लागू केल्यामुळे पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. हे ही वाचा- Hathras Gang rape : राहुल गांधींना धक्काबुक्की; UP च्या पोलिसांकडून अटक यावेळी राहुल गांधींनी मी एकटा जाणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तर त्यांंना धक्काबुक्की केली. यामध्ये राहुल गांधींची कॉलर पकडण्यात आली व ते खाली पडले. यादरम्यान राहुल गांधी मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नसल्याचं सांगत होते. यावेळी सुरू असलेल्या गदारोळात ‘ये देखो आज का हिंदुस्तान’ असं ते समाजमाध्यमांना सांगत होते.
या घटनेनंतर देशभरात मोठा गदारोळ झाला आहे. विविध नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.