JOIN US
मराठी बातम्या / देश / वारंवार शरीरसंबंधासाठी 89 वर्षीय पतीकडून त्रास, 87 वर्षांच्या पत्नीने थेट फोन करून सांगितला भयंकर प्रकार

वारंवार शरीरसंबंधासाठी 89 वर्षीय पतीकडून त्रास, 87 वर्षांच्या पत्नीने थेट फोन करून सांगितला भयंकर प्रकार

गुजरातमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वडोदरा, 12 सप्टेंबर : गुजरातच्या 181 अभयम हेल्पलाइनवर एक अशी केस आली आहे, जी ऐकून कोणीही हैराण होईल. महिलांच्या समस्या सोडवणाऱ्या या हेल्पलाइन नंबरवर एका 87 वर्षीय वृद्ध आणि आजारी महिलेने कॉल केला होता. वृद्ध महिलेने आपल्या 89 वर्षीय हायपरसेक्शुअल पतीपासून सुटकेसाठी मदत मागितली. आरोपी आहे की, वृद्ध पती आपल्या पत्नीसोबत वारंवार शरीर संबंध ठेवण्याची मागणी करतो. मात्र आजारी पत्नी त्याची ही इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत होती. अभयम हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये अनेक वर्षांपर्यंत चांगलं नातं होतं. मात्र एक वर्षांपूर्वी महिला आजारी पडली आणि अंथरुणाला खिळली. तिला अंथरुणावरुन हलणंही शक्य होत नव्हतं. सून-मुलाच्या मदतीने चालत होती. अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी पतीला आपल्या पत्नीच्या प्रकृतीविषयी माहिती होती. मात्र तरीही ते पत्नीवर शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करीत होते. अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो काढल्याप्रकरणी होता अटकेत; प्रेमाचा उल्लेख करत कोर्टाने दिला जामीन इच्छा अपूर्ण राहिल्याने पत्नीवर संतापले… पत्नीने नकार दिल्यानंतर रिटायर्ड इंजिनियर पती पत्नीसोबत भांडण करतो आणि पत्नी आणि मुलावर आरडाओरडा करतो. शेजारच्यांनाही याबाबत माहिती आहे. पिताच्या त्रासाला कंटाळून कुटुंबीयाने अभयमकडून मदत मागितली आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, आम्हाला दोन दिवसांपूर्वी कॉल आला होता. ज्यानंतर आम्ही तातडीने महिलेच्या मदतीसाठी घरी पोहोचलो. यानंतर महिलेच्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. अभयम टीमकडून समुपदेशन… अभयम टीमने आरोपी पतीचं समुपदेशन केलं आणि आपलं लक्ष दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवण्यासह योगा आणि सीनियर क्लब जॉइन करण्याचा सल्ला दिला. अभयम अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना सांगितलं की, त्यांचं समुदेशन केलं जावं आणि एखाद्या चांगल्या सेक्सॉलॉजिस्टची भेट घडवून आणावी. ते या प्रकरणात चांगला सल्ला देऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या