JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Nirmala sitharaman Birthday: पेट्रोलपासून कांद्यापर्यंत टीकेचं लक्ष्य बनूनही मंत्रिपद राहिलं कायम

Nirmala sitharaman Birthday: पेट्रोलपासून कांद्यापर्यंत टीकेचं लक्ष्य बनूनही मंत्रिपद राहिलं कायम

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांचा आज 62वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी तमिळनाडू राज्यातील मदुराईजवळ झाला होता.

0111

निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या.

जाहिरात
0211

नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घेतले होते. सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं.

जाहिरात
0311

सीतारामन यांनाआतापर्यंत विरोधकांची बरीच टीका झेलावी लागली आहे.

जाहिरात
0411

कांद्याचे भाव 100 रुपये किलोपर्यंत भिडले तेव्हा, संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्या 'मी कांदा-लसूण फार न खाणाऱ्या कुटुंबात वाढले', असं म्हणाल्या आणि प्रचंड टीका ओढवून घेतली.

जाहिरात
0511

पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडत चाललेले दरही आटोक्यात येणार नाहीत, अशी कटू घोषणा त्यांनी वाढदिवसाच्या एकच दिवस आधी केली.

जाहिरात
0611

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळ फेरबदलात भल्याभल्यांची खुर्ची गेली, पण निर्मला सीतारामन आपलं पद टिकवून आहेत.

जाहिरात
0711

देशाच्या पहिला महिल्या संरक्षण मंत्री होण्याव्यतिरिक्त सीतारामन पेशाने एक अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसेविका आहेत. त्यांचे वडील नारायण सीतारामन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत होते. वडील रेल्वेत असल्यामुळे सीतारामन यांचे बालपण विविध राज्यांमध्ये गेले आहे.

जाहिरात
0811

सीतारामन यांनी रामास्वामी महाविद्यालयातून बीए केले आहे. त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) अर्थशास्त्रातून एमए केले आहे. जेएनयूमध्ये त्यांनी एमफिल देखील पूर्ण केले.

जाहिरात
0911

निर्मला सीतारामन यांचे लग्न डॉक्टर पराकाला प्रभाकर यांच्याशी झाले. त्यांचे पती पराकाला प्रभाकर आंध्रप्रदेशचे रहिवासी आहेत. सीतारामन जेएनयूमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली.

जाहिरात
1011

प्रभाकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. प्रभाकर यांच्याबरोबर सीतारामन देखील लंडनमध्ये राहू लागल्या होत्या

जाहिरात
1111

हिंदूस्तान टाइम्सच्या अहवालानुसार लंडनमध्ये त्यांनी होम डेकोरमध्ये सेल्स गर्लचे काम केले होते. त्यानंतर त्यांनी प्राइसवॉटरहाउस कूपर्समध्ये सीनिअर मॅनेजर म्हणून काम केले होते. सीतारामन यांनी बीबीसी वर्ल्डमध्ये देखील काम केले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या