30 जून : जीएसटी अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. या नव्या करप्रणालीच्या स्वागतासाठी केंद्र सरकारने मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष सोहळा ठेवला आहे. मात्र काँग्रेस आणि आरजेडीसह ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसनं जीएसटी लाँचिंग कार्यक्रमात बहिष्कार घातला आहे. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीलाच या कार्यक्रमाला विरोध केला आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जाणार सोहळ्याला जाणार नाही आहे. पण जेडीयुतर्फे बिहारचे राज्यमंत्री विरेंद्र यादव कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. सत्ताधारी मंडळी आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. रात्री ११ वाजता सुरू होणारा हा सोहळा एक तास चालेल. 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात रात्री 12 वाजता जीएसटी लागू होत असल्याचं जाहीर करतील.