नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : इन्स्टाग्राम फॉलोअर्स आणि लाईक्सच्या नादात दोन तरुणांचा खून झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा खून तरुणीने केल्याची माहिती समोर आली आहे. तिने सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स आणि लाईक्सची संख्या वाढवण्यासाठी दोन तरुणांचा खून केल्याची घटना दिल्लीतील भलस्वा डेअरीजवळ घडली. तरुणीने एका तरुणाला चॅलेंज दिले होते की, त्याने आपल्या गल्लीत येऊन दाखवावे. हेच चॅलेंज त्या तरुणाला महगात पडलं. तिचे आव्हान स्वीकारणे तरुणाच्या जीवावर बेतलं. त्याचबरोबर, त्या तरुणासोबत असणाऱ्या १८ वर्षाच्या मित्रालादेखील आपला जीव गमवावा लागला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स अधिक असल्याने हा वाद होता. सोशल मीडियावर भांडण झाल्यानंतर गाजियाबादमधील अर्थला येथील राहणाऱ्या निखिल या तरुणाला तिने आपल्या गल्लीत येऊन दाखवावं, असं चॅलेंज दिलं होतं. त्यावेळी निखिल आपल्या १८ वर्षाचा मित्र साहिलला घेऊन तिच्या गल्लीत पोहोचला होता. यावेळी आधीच आपल्या मित्रांसोबत उपस्थित असलेल्या तरुणीने निखिल आणि साहिलवर चाकूने हल्ला चढवला. यानंतर हल्लेखोर पळून गेले.
हे ही वाचा : राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री, म्हणाली ‘मोदीजी चहा बनवताना…’
देवेश कुमार महल (डीसीपी) म्हणाले- तरुणीने आपल्या मित्रांना रात्री साडे अकरा वाजता बोलावून घेतलं होतं. नंतर त्या तरुणाला बोलावलं. जेव्हा तरुण त्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा चार जणांनी त्याच्यावर चाकून हल्ला चढविला. तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पुण्यातील मुलीला इन्स्टाग्रामवर फसवलं
पुण्यात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. फसवणुकीचे नवनवीन फंडे हे सायबर गुन्हेगार शोधत असतात. असाच एका नव्या पद्धतीने पुण्यात एका तरुणीला तब्बल 1 लाख 13 हजारांना गंडा घातला आहे. यावरून नागपूरच्या 23 वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार डायना स्पेन्सर नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : विरारमध्ये लोखंडी सळईने वार करत रस्त्यावरच तरुणाची हत्या, खळबळजनक CCTV फुटेज समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दादरा नगर हवेली येथे नोकरीला असून त्या पुण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अॅमेझॉनची एक लिंक आली. त्यामध्ये ई कॉमर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करा आणि पैसे कमवा असे लिहिले होते. तेव्हा त्यांनी त्यावर क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका मोबाईलवरुन मेसेज आला आणि त्यांना सर्व रजिस्ट्रेशन प्रक्रिया समजून सांगितली.