JOIN US
मराठी बातम्या / देश / हैदराबाद: ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुललं, भाजप दुसऱ्या स्थानावर

हैदराबाद: ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुललं, भाजप दुसऱ्या स्थानावर

2016च्या निवडणुकीत भाजप 4 टीआरएस 3 तर एमआयएमने 44 जागावर विजय मिळवला होता. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 हैदराबाद 04 डिसेंबर: हैदराबाद महापालिका निवडणूक निकालांनी सगळ्यांनाच दिवसभर घाम फोडला. सकाळी भाजपने जोरदार मुसंडी घेतली होती. त्यामुळे TRS आणि AIMIMला घाम फुटला. नंतर TRSने आघाडी घेतली आणि ती कायम राखली. मागच्या निवडणुकीत 4 जागांवर असलेल्या भाजपने 49 जागा घेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर ओवेसींचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भाजपने ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलविल्याने पक्षाचे नेत्यांनी जल्लोष केला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीत टीआरएसला 56, भाजप 49 आणि एमआयएमला 42 जागा मिळाल्या आहेत. यात सर्वात जास्त लक्षवेधी ठरली ती भाजपची किमगिरी. भाजपने मोठी ताकद या ठिकाणी लावली होती. अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचाराला आले होते. भाजपकडून अमित शाह यांच्यापासून ते स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी कंबर कसली होती. हैदराबादमध्ये कमळ फुलवण्याचा निश्चय करत त्यांनी प्रचार केला आणि 2016च्या तुलनेत प्रचंड यश मिळवलं. नगरपालिका निवडणुकीत देशात पहिल्यांदाच भाजप इतक्या आक्रमक आणि पूर्ण तयारीनिशी उतरल्याचं पाहायला मिळालं. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही तयारी असल्याची चर्चा आहे. 2023 रोजी तेलंगणा इथे विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीला जरी वेळ असला तरी भाजपसाठी इथल्या 24 विधनसभेच्या जागा आणि 5 लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी आताची निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या

हैदराबाद महानगरपालिकेत एकूण 150 वॉर्ड आहेत. सत्ताधारी टीआरएसने सर्व 150 वॉर्डांवर निवडणूक लढवली होती. भाजप 149 वॉर्ड, काँग्रेस 146 वॉर्डांवर टीडीपी 106, एमआयएम 51, सीपीआय 17, सीपीएम 12 आणि अन्य पक्षांनी 76 वॉर्डात निवडणूक लढवली. 2016च्या निवडणुकीत भाजप 4 टीआरएस 3 तर एमआयएमने 44 जागावर विजय मिळवला होता. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या