JOIN US
मराठी बातम्या / देश / Mega Vaccination Drive: मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण

Mega Vaccination Drive: मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण

Mega Vaccination Drive On Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून (21 जून) देशात 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाचं मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून (21 जून) देशात 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाचं मोफत कोरोना लसीकरण (Free COVID-19 vaccine) करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना मोफत लसीकरणााची (Vaccination Drive) घोषणा केली. त्यांनी आपल्या घोषणेत म्हटलं होतं की, 21 जूनपासून सरकार 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचं विनामूल्य लसीकरण करेल. आजपासून जगातील सर्वात मोठ्या मोफत लसीकरण मोहिमेची सुरुवात होत आहे. (all citizens above the age of 18 ) नवीन मोफत लसीकरण धोरण काय आहे ते जाणून घ्या नवीन लसीकरण मोहिमेत 18 ते 44 वयोगटातील नागरिक थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. यापूर्वी ही लस घेण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना CoWIN पोर्टलद्वारे अपॉईंटमेंट घेणे आवश्यक होते. मात्र या मोहिमेनुसार, 18 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत लस दिली जाईल. या मोठ्या लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल आणि राज्यांना काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. दरम्यान खासगी रुग्णालयात लस मिळण्यासाठी किंमत मोजावी लागेल. मुंबई पालिका सज्ज कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाच्या मोहिमेची व्याप्ती आजपासून अधिक वाढणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी मुंबई पालिका सज्ज झाली आहे. पालिकेनं नियोजन केलं आहे. लसीकरणासाठी नोंदणी तसेच इतर अडचणी येऊ नयेत, म्हणूनही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठीच, पहिल्या टप्प्यात 30 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 18 ते 29 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. पालिकेनं आठवड्यातील तीन दिवस हे थेट लसीकरणासाठी राखीव ठेवले असून आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी कोणतीही नोंदणी न करता नागरिकांना थेट लस घेता येणार आहे. तर गुरुवार ते शनिवार हे तीन दिवस मात्र नोंदणी करूनच लस दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या