JOIN US
मराठी बातम्या / देश / Farmers Protest : दिल्लीत हिंसा करणारे 6 जण, दिल्ली पोलिसांकडे 200 VIDEO

Farmers Protest : दिल्लीत हिंसा करणारे 6 जण, दिल्ली पोलिसांकडे 200 VIDEO

देशाच्या राजधानीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं (Farmers Protest) आयोजन केलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण (Violence in tractor rally) लागलं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जानेवारी : देशाच्या राजधानीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं (Farmers Protest) आयोजन केलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण (Violence in tractor rally) लागलं होतं. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये हिंसा झाली. आंदोलनकर्ते लाल किल्ल्यामध्येही घुसले होते. आता दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंसा भडकवणाऱ्या 6 जणांना ओळखण्यात आलं आहे. पोलिसांनी 200 पेक्षा जास्त व्हिडिओ फूटेज बघून हिंसाचार करणाऱ्यांना ओळखलं आहे. या 6 जणांनी हिंसा भडकवण्यात भूमिका बजावल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. व्हिडिओ फुटेजच्या आधारावर या 6 जणांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडवेळी पोलिसांनी 10 फोटोग्राफर आणि 10 व्हिडिओ कॅमेरा बाहेरून शुटिंगसाठी मागवले होते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर याचा वापर आंदोलनाच्या ठिकाणी करण्यात आला. या फोटोग्राफर आणि कॅमेरामनकडूनही फोटो आणि व्हिडिओ घेण्यात आले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून आंदोलन करणाऱ्यांना शोधण्यात येत आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी नागरिकांचीही मदत मागितली आहे. हिंसेदरम्यान ज्या लोकांनी मोबाईल कॅमेरावर व्हिडिओ बनवले आहेत, ते पोलिसांना द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. पोलिसांना आतापर्यंत 200 व्हिडिओ मिळाले आहेत. चौकशीदरम्यान काही शेतकरी नेत्यांचे व्हिडिओदेखील यात आहेत, ज्यांनी भडकाऊ भाषणं दिली होती. शेतकरी आंदोलन जेव्हापासून सुरू झालं, तेव्हापासून 26 जानेवारीपर्यंत जेवढे व्हॉट्सऍप ग्रुप तयार झाले, त्याची चौकशी सुरू झाली आहे. काही व्हॉट्सऍप ग्रुपवरून आंदोलनाला हिंसक वळण द्यायचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. दिल्लीच्या ज्या भागांमध्ये हिंसा झाली, त्या सगळ्या भागांमधला डंप डेटा काढण्यात येत आहे, ज्यामुळे आरोपींना शोधणं सोपं जाईल. डंप डेटा मोबाईल टॉवरवरून घेतला जातो. कॉल डिटेल्सच्या आधारावर ज्या नंबरचा संशय असतो, त्याची चौकशी केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या