JOIN US
मराठी बातम्या / देश / शेतकरी आंदोलनातला आणखी एक धक्कादायक VIDEO: महिला पोलिसावर हल्ल्याचा प्रयत्न

शेतकरी आंदोलनातला आणखी एक धक्कादायक VIDEO: महिला पोलिसावर हल्ल्याचा प्रयत्न

Farmer’s Protest: कृषी कायद्यांविरोधात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला आहे.या रॅलीदरम्यान आंदोलकांनी महिला पोलिसावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 26 जानेवारी: कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (farmers protest) आता हिंसक वळण प्राप्त झालं आहे. आज होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (Kisan Tractor Rally)पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झटापटही झाली आहे. दरम्यान, यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी एका महिला पोलीस कर्मचारीवर ( delhi police)लाठी हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

संबंधित बातम्या

रॅलीदरम्यान शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडल्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराचा वापरही केला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आंदोलन करत आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने (supreme court) मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या