नवी दिल्ली, 20 डिसेंबर : शेतकरी आंदोलनाची (Farmers’ protest) चर्चा देशातल्या लहान गावापासून ते अगदी महानगरापर्यंत सुरू आहे. लोक दोन टोकांची मतं व्यक्त करताना दिसत आहेत. जनमानसाची भावना जाणून घेण्यासाठी ‘न्यूज 18 नेटवर्क’ने सर्वेक्षण (survey) घेतलं. त्यातून बाहेर आलेले निष्कर्ष सामान्य जनतेच्या मनाचा आरसा दाखवतात. मुख्य निष्कर्ष : सर्वेत सहभागी झालेल्या 56.59% लोकांना वाटतं की आता आंदोलन थांबवलं पाहिजे तर 53.6% लोक नव्या कृषी कायद्यांना पाठिंबा देतात. 48.71% लोकांना वाटतं की हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि 52.69% लोकांना वाटतं, की शेतकऱ्यांनी नवे कृषी कायदे मागे घेतले जावेत असा आग्रह करू नये आणि नक्कीच तडजोड करावी. 60.90% लोकांना वाटतं की नव्या कृषी कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. सोबतच 73.05% लोक शेतीच्या आधुनिकीकरण आणि सुधारणांना पाठिंबा देतात. 69.65% लोक शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेर उत्पादनं विकण्याचा पर्याय देण्याचं स्वागत करतात. 53.94% एमएसपी व्यवस्था तशीच राहिल या पंतप्रधानांच्या लेखी आश्वासनाला पाठिंबा देतात आणि 66.71% लोक पराळी जाळण्यावर बंदी घालण्याचा अध्यादेश मागं घ्यावा या शेतकऱ्यांच्या भूमिकेला विरोध करतात. सर्वेक्षणात विचारले गेलेल प्रश्न… न्यूज 18 नेटवर्कनं केलेलं हे सर्वेक्षण 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 2412 लोकांचे नमूने असलेलं आहे. यात खालील प्रश्न विचारले गेले होते. 1.तुम्ही भारतीय शेतीतील सुधारणा आणि आधुनिकीकरणाचं समर्थन करता का? - होय, ही काळाची गरज आहे/नाही, हे अनावश्यक आहे. 2. शासनाच्या म्हणण्यानुसार भारतीय कृषीव्यवस्थेचं आधुनिकीकरण करत शेतकऱ्याला फायदा मिळवून देणाऱ्या नियमांना तुम्ही पाठिंबा देता का? - हो, नक्की/मला नक्की माहित नाही 3. हे कायदे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं सरकारी बाजार समितीबाहेर विकण्याची परवानगी देतात याची तुम्हाला माहिती आहे का? 4. तुम्ही शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेर उत्पादनं विकण्याचा पर्याय देण्याचं समर्थन करता का? हो हे बरोबर आहे/नाही, सध्याची व्यवस्थाच चांगली आहे. 5. नव्या कायद्यांमुळे व्यापक निर्णयक्षेत्र मिळाले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची चांगली किंमत मिळेल असे तुम्हाला वाटते का? - हो/नाही 6. तांदुळ, गहू आणि इतर वीसहून अधिक उत्पादनांची किमान आधारभूत किंमत कायमच राहिल हे पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन तुम्हाला ठाऊक आहे का? हो, मला ठाऊक आहे/नाही, हे माझ्यासाठी नवीन आहे 7. एमएसपी व्यवस्था तशीच राहिल या पंतप्रधानांच्या लेखी आश्वासनाला तुम्ही पाठिंबा देता का? हो, मी पाठिंबा देतो/नाही, मी पाठिंबा देत नाही/मला नक्की सांगता येणार नाही 8. जे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत ते नव्या कृषी सुधारणा कायद्यांना पूर्णत: मागे घेण्यास सांगत आहेत. आंदोलक म्हणत आहेत, की ते याहून कमी कशावर राजी होणार नाहीत. याला तुमचं समर्थन आहे का? हो, माझं समर्थन आहे/नाही त्यांनी तडजोड केली पाहिजे 9.आंदोलकांच्या अनेक मागण्यांपैकी एक म्हणजे, सरकारनं ज्यातून दिल्ली आणि आसपासच्या भागात प्रदूषण होतं अशा पराळी जाळण्यावर बंदी घालण्याचा अध्यादेश मागं घ्यावा. शेतकऱ्यांच्या या भूमिकेला तुम्ही पाठिंबा देता का? हो, दिल्लीतील प्रदुषणाने काही फरक पडत नाही नाही, ही भूमिका अयोग्य आहे 10. तुम्हाला माहित आहे का, की अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सत्तेत असताना अशाच प्रकारच्या कायद्यांना समर्थन दिलं होतं? हो/नाही 11. तुम्हाला असं वाटतं का, की हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे? हो/नाही/सांगू शकत नाही 12. आता आंदोलन थांबवण्याची वेळ आली आहे का? हो, आता आंदोलकांनी घरी जावं नाही, आंदोलन सुरू राहिलं पाहिजे सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून समोर आले, की बहुतांश लोकांना वाटतं, की नवे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील. आंदोलकांनी आता आंदोलन थांबवावं असंही त्यांचं म्हणणं आहे.