JOIN US
मराठी बातम्या / देश / बनावट स्वाक्षरीने IAS पोस्टिंग मिळवलं; चार लग्न आणि एका तरुणीला जाळ्यात अडकवलं

बनावट स्वाक्षरीने IAS पोस्टिंग मिळवलं; चार लग्न आणि एका तरुणीला जाळ्यात अडकवलं

मध्यप्रदेशातला बनावट आयएएस अधिकारी संतोष वर्मा (Santosh Verma) सध्या पोलीस कोठडीत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 14 जुलै: मध्य प्रदेशातला बनावट आयएएस अधिकारी संतोष वर्मा (Santosh Verma) सध्या पोलीस कोठडीत असून, त्याला आज (14 जुलै) कोर्टात हजर केलं आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्या बाबतीत अनेक धक्कादायक बाबी बाहेर येत आहेत. बनावट सहीने आयएएस अधिकारी (Fake Signature) बनण्यापासून अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे आरोप त्याच्यावर आहेत. राज्याच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला भारतीय प्रशासकीय सेवेत बढती (Promotion) द्यायची झाल्यास संबंधित अधिकाऱ्याची आधी चौकशी केली जाते आणि पार्श्वभूमी तपासली जाते. किरकोळ गुन्हा असला, तरी त्यांना IAS केलं जात नाही. संतोष वर्मा विरोधात दोन खटले प्रलंबित होते. ती माहिती DPC ला मिळाली असती, तर त्याला कधीच IAS पोस्टिंग मिळालं नसतं. म्हणून वर्माने CBI आणि व्यावसायिक परीक्षा मंडळाचे विशेष न्यायाधीश विजेंद्रसिंह रावत यांच्या बनावट स्वाक्षरीने कोर्ट आदेश तयार करून ते सादर केले. त्या आदेशाच्या आधारे त्याचं IAS अधिकारी म्हणून पोस्टिंग झाल्याचं ‘ दैनिक भास्कर ’ने वृत्त दिलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे बरेच वरपर्यंत पोहोचलेले असल्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यासाठी वर्माने कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचं बोललं जात आहे. पोलीस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी सांगितलं, जसजसे पुरावे समोर येतील, तसतशी संबंधित दोषी व्यक्तींना अटक केली जाईल. वर्माने आतापर्यंत चार विवाह केले असून, एका युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. रीवा येथे सांख्यिकी अधिकारी म्हणून पोस्टिंग असताना त्याच्याकडे काम करणाऱ्या युवतीवर त्याचं प्रेम जडलं. तिच्याशी त्याने विवाहही केला. वर्मा उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) बनला, तेव्हा त्याने दोन विवाह केले. त्यानंतर काही दिवसांनी हरदा येथे राहणाऱ्या युवतीवर त्याचं प्रेम बसलं. तिच्यावर त्याने कोट्यवधी रुपये उडवल्याचंही समोर आलं आहे; मात्र ती युवती जेव्हा विवाह करण्याचा आग्रह धरू लागली, तेव्हा मात्र त्याने फारकत घेतली. त्यानंतर ती युवती वैतागली आणि तिने पोलिसांत तक्रार केली. त्याबद्दल तपास करतानाच पोलिसांना एकेक गोष्टी उलगडत गेल्या आणि वर्मा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दरम्यानच्या काळात घडलेलं आणखी एक प्रकरणही पोलिसांत पोहोचलं होतं. धारमध्ये असताना इंदूरमधल्या विमा एजंट युवतीशी वर्माने लग्न केलं होतं; मात्र तो तिच्यासोबत राहण्यास टाळाटाळ करू लागला. त्यानंतर थोड्या दिवसांनी तिनेही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वर्माचे बरेच प्रताप पुढे आले. आता आयएएस अधिकारी (Fake IAS Officer) म्हणून त्याचं निलंबन एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या