रायपूर, 23 मार्च : छत्तीसगडच्या (Chattisgarh) नारायणपूर (narayanpur) जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी स्फोट (Police Personnel bus IED blast by maoist) करुन उडवली आहे. या घटनेत 3 जवान शहीद झाले असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 50 च्या आसपास जवान या बसमधून प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे. हल्ल्यातील जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिदुर्गम भाग असल्याने नेटवर्क नाही, त्यामुळे माहिती मिळवण्यासही अडचणी येत आहेत. जखमी जवानांना मदत पोहोचवण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या सगळया कॅम्पमधून मदतीसाठी जवान रवाना करण्यात आले आहेत. जखमींना नारायणपूरच्या रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (ही बातमी अपडेट होत आहे)