JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / दिल्लीतील पावसानं मोडलं 19 वर्षांचं रेकॉर्ड, राजधानीत पाणीच पाणी, पाहा PHOTOS

दिल्लीतील पावसानं मोडलं 19 वर्षांचं रेकॉर्ड, राजधानीत पाणीच पाणी, पाहा PHOTOS

दिल्लीत (Delhi) गेल्या 24 तासांपासून सलग सुरू असलेल्या पावसाने (Heavy rains) आता जनजीवन ठप्प व्हायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने (IMD) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आणखी दोन ते तीन वेळा मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

0106

गेल्या 48 तासांपासून दिल्लीत जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 24 तासांतदेखील पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जाहिरात
0206

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत गेल्या 27 तासात 11.2 सेमी पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाचा विचार करता गेल्या 19 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
0306

या पावसामुळे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

जाहिरात
0406

दिल्लीतील अनेक भागात झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी किरकोळ अपघातांचीदेखील नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात
0506

या पावसाचा सर्वाधिक फटका नोएडा आणि गाजियाबाद भागाला बसला आहे. या भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतूक ठप्प झाली आहे.

जाहिरात
0606

दिल्लीच्या ग्रामीण भागात यामुळे मोठा परिणाम झाला असून अनेक गावांमध्ये गेल्या अनेक तासांपासून वीज गायब आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या