JOIN US
मराठी बातम्या / देश / बाईकला टच केलं म्हणून शरीरावर दिल्या असंख्य जखमा, 'मर्डर'चा हादरवणारा VIDEO कॅमेऱ्याद कैद

बाईकला टच केलं म्हणून शरीरावर दिल्या असंख्य जखमा, 'मर्डर'चा हादरवणारा VIDEO कॅमेऱ्याद कैद

एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. तरुण जीव वाचवण्यासाठी हात जोडतो मात्र त्याचा जीव वाचवण्यासाठी कोणी पुढे येत नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. तरुण जीव वाचवण्यासाठी हात जोडतो मात्र त्याचा जीव वाचवण्यासाठी कोणी पुढे येत नाही. हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आणि राजधानी दिल्ली हादरली आहे. दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. यावेळी चार जण जखमी झाले आहेत. मंगोलपुरीच्या के-ब्लॉकमध्ये दुचाकीला हात लावण्यावरून यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना जवळच्या संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी अरमानला मृत घोषित केले.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरमान जीव वाचवण्यासाठी त्यांना याचना करत आहे. मात्र आरोपी त्याला सोडत नाहीत. एकामागे एक धारदार शस्त्राने वार करत असल्याचं दिसत आहे. या घटनेवरून ट्वीटरवर संताप व्यक्त केला जात आहे. तर परिसरात तणावाचं वातावरण आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर खरं कारण समोर येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या