JOIN US
मराठी बातम्या / देश / दुकानासमोर रोज करायचा लघुशंका, दुकानदारांनी मिळून केलेल्या मारहाणी तरुणाचा मृत्यू

दुकानासमोर रोज करायचा लघुशंका, दुकानदारांनी मिळून केलेल्या मारहाणी तरुणाचा मृत्यू

लघुशंकेवरून झाला वाद, दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तरुणाची हत्या

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : रोज दुकानासमोर लघुशंका करणाऱ्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यातून तरुणाची हत्ये करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीमध्ये घडला आहे. दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलास परिसरात दुकानांसमोर एक तरुण लघुशंका करायचा. त्यावरून अनेक वेळा त्याला टोकण्यात देखील आलं होतं. मात्र हा तरुण ऐकण्याचं नाव घेत नाही हे पाहून शेवटी त्याला दम दिला. डीसीपी आरपी मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री कैलास परिसरात ब्लॉक मार्किटमध्ये 34 वर्षांचा जगजीत उर्फ विकी किराणा दुकानासमोर लघुशंका करत होता. त्या दुकानात विनय आणि विमल नावाचे दोन तरुण दुकान बंद करत असताना रात्री उशिरा हा सगळा प्रकार घडला आणि त्यांनी विकीला खडसावलं. विकी आणि दोन तरुणांमध्ये तू-तू मैं-मै झालं आणि हा वाद वाढत गेला. हे वाचा- नालासोपारा हादरलं, वाघोलीत केबलचालकाची कोयत्याने वार करून हत्या विकीने रागाच्या भरात आपल्या मित्रांना अमनदीप,करण, अमित ,रमनदीप,गुरविंदर जसप्रीत बोलवलं आणि वाद पुन्हा उफाळून आला. दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली, यावेळी स्थानिक दुकानदारांनी मध्यस्ती केली आणि दुकानाबाहेर लघुशंका करणाऱ्या विकीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून विकीचे मित्र पळून गेले आणि त्यातला एक अमनदीप नावाचा मित्र शेजारी असणाऱ्या मंदिरासमोर कोसळला. त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमनदीपच्या पाठीवर एकानं धारदार शस्त्रानं वार केले होते त्यामुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी किराणा मालविक्रेता दुकानदार विनय आणि विमलविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. या वादात अनेक जणांना दुखापत झाली आहे. अमनदीप एक ट्रॅव्हल एजन्सी चालवत होता तर विकीचा टॅक्सी व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या